जिल्हा बँकेकडून जारकरवाडी सोसायटीचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बँकेकडून जारकरवाडी सोसायटीचा गौरव
जिल्हा बँकेकडून जारकरवाडी सोसायटीचा गौरव

जिल्हा बँकेकडून जारकरवाडी सोसायटीचा गौरव

sakal_logo
By

पारगाव, ता. ७ : जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने २०२०-२१ या वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने कायमस्वरूपी ढाल देऊन गौरव करण्यात आला.

शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या हस्ते ही ढाल देण्यात आली. ढालीचा स्वीकार भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष खंडू भोजने, तत्कालीन उपाध्यक्ष नंदा लांबहाते, विद्यमान अध्यक्ष सूर्यकांत लबडे पाटील, उपाध्यक्ष संतोष कापडी, सरपंच रूपाली भोजने, जालिंदर भांड, आनंदराव भोजने, गोविंद ढोबळे, अशोक देव्हडे, सुरेश विधाटे, बॅरिस्टर लबडे, सुरेश खुडे, लक्ष्मण भोजने सचिव नवनाथ मंचरे यांनी केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00564 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top