
अवसरी बुद्रुक परिसरात विजेचे खांब, झाडे उन्मळली
पारगाव, ता. ११ : मॉन्सून पूर्व पावसाने सलग तिसऱ्या दिवशी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागाला जोरदार झोडपले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक घरांचे पत्रे व कौले उडाली, अनेक गावांत विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली. शेतात पाणी साचले. तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक, टाव्हरेवाडी, पारगाव, लोणी, धामणी, खडकवाडी, मेंगडेवाडी, काठापूर बुद्रुक आदी गावांच्या परिसराला गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसाने झोडपले असून आज सायंकाळच्या सुमारास पुन्हा एकदा पाऊस झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
गेल्या तीन दिवसांपासून वरुणराजाची या परिसरात दमदार बॅटिंग सुरू असून या पावसामुळे आता शेती मशागतीच्या कामांना वेग येणार असून लवकरच बळिराजा आता पेरण्यांना सुरुवात करणार असल्याचे टाव्हरेवाडीचे सरपंच उत्तम टाव्हरे व अवसरी बुद्रुक चे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर सांगितले. या पावसाने अनेक ठिकाणी शेतीचे बांध फुटून शेतीला ओढ्याचे स्वरूप आले आहे.
सतत तीन दिवस जरी पाऊस चालू असला तरी पावसामुळे वीज वितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी करायची कामे वेळेत न केल्यामुळे विजेचा लपंडाव चालू असून तीन दिवस रात्रीची वीज गायब होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00579 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..