‘भीमाशंकर’चे बिगूल वाजले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘भीमाशंकर’चे 
बिगूल वाजले!
‘भीमाशंकर’चे बिगूल वाजले!

‘भीमाशंकर’चे बिगूल वाजले!

sakal_logo
By

पारगाव, ता. १२ : साखर उद्योगात अग्रेसर असलेल्या दत्तात्रेयनगर-पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगूल वाजले असून, सोमवारपासून (ता. १३) नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरवात होणार आहे.
कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यमान संचालक मंडळास सुमारे दोन वर्षाची मुदतवाढ मिळाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी तथा आंबेगाव-जुन्नरचे उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर यांनी सन २०२२-२३ ते २०२७-२८ साठी भीमाशंकर साखर कारखान्याचा संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सभासदांनी निवडून द्यावयाचे प्रतिनिधी पारगावतर्फे अवसरी बुद्रुक-निरगुडसर गट- तीन जागा शिंगवे-रांजणी गट- तीन जागा, अवसरी बुद्रुक-पेठ गट- तीन जागा, मंचर-महाळुंगे गट- तीन जागा, घोडेगाव- शिनोली गट- तीन जागा, उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी- एक जागा, अनुसूचित जाती किंवा जमाती- एक जागा, महिला राखीव प्रतिनिधी- दोन जागा, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी- एक जागा, भटक्या विमुक्त जाती व जमाती किंवा विशेष मागासप्रवर्गातील प्रतिनिधी- एक जागा, अशा प्रकारे एकूण २१ जागांसाठी निवडणूक होत आहे.

निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशन पत्र दाखल करणे- सोमवार (ता. १३) ते शुक्रवारपर्यंत (ता. १७) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत (सार्वजनिक सुटीचा दिवस वगळून)
अर्ज दाखल करण्याचे ठिकाण- तहसीलदार यांचे कार्यालय, घोडेगाव (ता. आंबेगाव)
नामनिर्देशन पत्रांची छाननी- २० जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत
नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची मुदत- मंगळवार (ता. २१) ते ५ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत
पात्र उमेदवारांचे अंतिम यादी व चिन्ह वाटप- ६ जुलै
मतदान- १७ जुलै रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
मतमोजणी- १९ जुलै रोजी.

शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
कारखान्याच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत एकूण २१ जागांपैकी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १६ जागांसाठी निवडणूक झाली होती. वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते, तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने फक्त १२ उमेदवार उभे केले होते. राष्ट्रवादीने निवडणूक झालेल्या १६ जागा मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या. यावेळी परिस्थिती बदलली आहे. राज्यातील राजकीय गणिते बदलली आहेत. एकमेकांच्या विरोधात असलेले शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस हे महाविकास आघाडीच्या रूपाने राज्यात सत्तेत आहेत. त्यामुळे आढळराव पाटील हे आघाडीचा धर्म पाळून निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य करतात का किंवा उमेदवार उभे करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, भाजप कोणती भूमिका घेते, याचीही उत्सुकता आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00580 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top