अवसरीचे तलाठी कार्यालय पाडल्याप्रकरणी अखेर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवसरीचे तलाठी कार्यालय 
पाडल्याप्रकरणी अखेर गुन्हा
अवसरीचे तलाठी कार्यालय पाडल्याप्रकरणी अखेर गुन्हा

अवसरीचे तलाठी कार्यालय पाडल्याप्रकरणी अखेर गुन्हा

sakal_logo
By

पारगाव, ता. २० : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील ३७ वर्षे जुने तलाठी कार्यालय बेकायदेशीररीत्या पाडल्यासंदर्भात अखेर मंचर पोलिस ठाण्यामध्ये अवसरी बुद्रुक दूध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष, सचिव व दोन कामगारांच्या विरुद्ध सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
अवसरी बुद्रुक येथील दूध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष, सचिव यांनी दोन कामगारांच्या साहाय्याने १ मे रोजी
तलाठी कार्यालयाची इमारत विनापरवानगी बेकायदेशीरपणे पाडली. या विरोधात शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार रमा जोशी यांना निवेदन देत प्रांत कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर संबंधित दोषींवर गुन्हा दाखल होईल, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले होते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर तहसीलदारांनी संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
मंचर पोलिस ठाण्यामध्ये गाव कामगार तलाठी, ग्रामविकास अधिकारी व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांनी दोन वेळा अर्ज करूनही मंचर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होत नव्हता. अनेक वेळा पाठपुरावा करून देखील गुन्हा दाखल होत नव्हता. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मंचर पोलिस ठाण्यासमोर उपोषणाचा इशारा दिल्यानंतर अखेर बुधवारी (ता. १३) गाव कामगार तलाठी संकेत शिवाजी गवारे यांच्या फिर्यादीवरून मंचर पोलिसांनी संभाजी रामदास हिंगे, मच्छिंद्र भागूजी हिंगे (दोन्ही रा. अवसरी बुद्रुक) व इतर दोन व्यक्ती (नाव व पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
याबाबत शिवसेनेचे उपतालुका प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य अजित चव्हाण म्हणाले, ‘‘तलाठी कार्यालय पाडल्याप्रकरणी शिवसेनेच्या वतीने पुराव्याबाबत सर्व कागदपत्रे सादर केली, त्याची दखल घेऊन तहसीलदारांनी संबधितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईने यापुढे सरकारी जागा बळकावण्याच्या उद्देशाने अतिक्रमण करणाऱ्यांवर जरब बसणार आहे.’’

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00633 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..