अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करा
अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करा

अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करा

sakal_logo
By

पारगाव, ता. ५ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, शिरदाळे व पहाडदरा या परिसरात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शासनाने या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी या भागातील लोकप्रतिनिधी व सरपंच, उपसरपंच, सदस्य व शेतकरी घोडेगाव येथील तहसील कार्यालयासमोर बुधवारी (ता. १०) लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
याबाबतचे निवेदन तहसीलदार रमा जोशी यांना दिल्याची माहिती पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखिले यांनी दिली. या निवेदनात म्हटले आहे की, लोणी, धामणी, शिरदाळे व पहाडदरा परिसरात गेली आठ दिवसात अतिपर्जन्य झाल्यामुळे बटाटा, सोयाबीन, वाटाणा, बाजरी, भुईमूग ही पिके १०० टक्के वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. तर, काही पिके पूर्णपणे सडून गेली आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित या खरीप हंगामावर अवलंबून असते. दरवर्षी पाचवीला पुजलेला दुष्काळ आणि यावर्षीचा अतिपाऊस, यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नियमानुसार ६५ टक्के पर्जन्य आणि ३३ टक्के नुकसान झाले, तरच शासकीय मदत मिळते, परंतु पर्जन्य मोजण्याचे साधन पारगाव (शिंगवे) या ठिकाणी आहे, तर पाऊस धामणी शिरदाळे परिसरात होत आहे. त्यामुळे पावसाचे मोजमाप योग्य पद्धतीने होत नाही. प्रत्यक्ष मात्र शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी अधिकारी अथवा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनी संपर्क केला असता समाधानकारक उत्तर मिळत नाही. पुढील दोन दिवसात पंचनामे करून जर यावर कार्यवाही झाली नाही, तर आम्ही सर्व लोकप्रतिनिधी तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
धामणीचे सरपंच सागर जाधव व शिवसेना उपतालुका प्रमुख अजित चव्हाण यांनी तहसीलदार जोशी यांना निवेदन दिले.

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00676 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top