काठापूर येथे अपघातात आई-मुलगा गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काठापूर येथे अपघातात
आई-मुलगा गंभीर जखमी
काठापूर येथे अपघातात आई-मुलगा गंभीर जखमी

काठापूर येथे अपघातात आई-मुलगा गंभीर जखमी

sakal_logo
By

पारगाव, ता. ५ : काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे पारगाव-शिरूर रस्त्यावर पोंदेवाडी फाट्याजवळ मोटार व स्कुटी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात स्कुटी चालवत असलेल्या शोभा संतोष बोंबे (वय ३५, रा. पोंदेवाडी, ता. आंबेगाव) व मागे बसलेला त्यांचा मुलगा तन्मय (वय ११) हे आई व मुलगा जखमी झाले.
शोभा बोंबे या शुक्रवारी (ता. ५) स्कुटीवरून मुलगा तन्मय यास पारगाव येथील शाळेत सोडण्यासाठी चालल्या होत्या. पारगाव-शिरूर रस्त्यावर पोंदेवाडी फाट्याजवळ पारगावच्या बाजूने समोरून येणाऱ्या मोटारीची (क्र. एमएच १९ सीएफ २५३४) व त्यांच्या स्कूटीची धडक झाली. या अपघातात शोभा व तन्मय हे मायलेक जखमी झाले. शोभा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोटार चालक विनायक कृष्णराव आढळराव (रा. मंचर, ता. आंबेगाव) यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पारगाव पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. एस. लोकरे व हवालदार एस. वाय. साळवे यांनी पंचनामा केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00677 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top