शिरदाळ्यात महसूल विभागाकडून पडलेली घरे, गोठ्यांची पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरदाळ्यात महसूल विभागाकडून पडलेली घरे, गोठ्यांची पाहणी
शिरदाळ्यात महसूल विभागाकडून पडलेली घरे, गोठ्यांची पाहणी

शिरदाळ्यात महसूल विभागाकडून पडलेली घरे, गोठ्यांची पाहणी

sakal_logo
By

पारगाव, ता.६ : शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची तसेच पडलेल्या घरे, गोठ्याची पाहणी कृषी विभाग तसेच महसूल विभाग यांच्याकडून करण्यात आली.
कृषी विभागातर्फे कृषी सहायक छाया शिंदे तर महसूल विभागातर्फे तलाठी मुंगळे व कोतवाल गणपत भांडलकर यांनी शेतातील सडलेले बटाटा व सोयाबीन पिकांची तसेच पडलेल्या घरांची व गोठ्याची पाहणी केली.
यावेळी उपसरपंच मयूर सरडे, शेतकरी गणेश तांबे, निवृत्ती तांबे, राघू रणपिसे, तात्याभाऊ चौधरी, निखिल तांबे, विक्रम तांबे हे उपस्थित होते.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर लवकरच याचा अहवाल वरिष्ठांना पाठवला जाईल, असे छाया शिंदे व मुंगळे यांनी सांगितले. बटाटा पीक, सोयाबीन,वाटाणा या पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे पाहणीत आढळून आले. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे सरपंच वंदना तांबे यांनी सांगितले.


01332

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00678 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..