लोणी कृषी उपबाजारामध्ये कांद्यास उच्चांकी बाजारभाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणी कृषी उपबाजारामध्ये कांद्यास उच्चांकी बाजारभाव
लोणी कृषी उपबाजारामध्ये कांद्यास उच्चांकी बाजारभाव

लोणी कृषी उपबाजारामध्ये कांद्यास उच्चांकी बाजारभाव

sakal_logo
By

पारगाव, ता.२३ : लोणी (ता.आंबेगाव) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (मंचर) उपबाजारामध्ये आडत पद्धतीने कांदा लिलावाचा प्रारंभ करण्यात आला. सोमवारी (ता.२२)एकूण ९२४ कांदा पिशव्यांची आवक झाली. मेसर्स झुंबरशेठ लहानू वाळुंज यांच्या आडत गाळ्यावर विजय आदक या शेतकऱ्याच्या कांद्यास प्रति १० किलोस १७५ रुपये उच्चांकी बाजारभावाने खरेदीदार मनोहर ढोबळे यांनी लिलावात बोली लावून माल खरेदी केला. हा या हंगामातील कांद्याला उच्चांकी बाजार मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

शेतकऱ्यांनी आपला कांदा लोणी उपबाजार समितीमध्ये कांद्याची निवड व प्रतवारी करून, विक्रीस आणावा आपल्या मालाला योग्य बाजारभाव दिला जाईल असे बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी आवाहन केले आहे. कांदा लिलावामध्ये मच्छिंद्र वाळुंज, महेंद्र वाळुंज, ज्ञानेश्वर वाळुंज, नितीन नरवडे, विजय पळसकर, अशोक वाळुंज, अनशिराम इंदोरे, मनोहर ढोबळे, संजय भोजने आदींनी कांदा लिलावात सहभाग घेतला. कांदा लिलावाचे वार सोमवार बुधवार व शनिवार असे आहेत, अशी माहिती लोणी उपबाजार समितीचे कार्यालय प्रमुख अशोक राजापुरे यांनी दिली.

01389

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00708 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..