पारगावच्या बंधाऱ्यावरील २० ढापे लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारगावच्या बंधाऱ्यावरील २० ढापे लंपास
पारगावच्या बंधाऱ्यावरील २० ढापे लंपास

पारगावच्या बंधाऱ्यावरील २० ढापे लंपास

sakal_logo
By

पारगाव, ता.२२: पारगाव (ता. आंबेगाव) येथील खार ओढा येथे असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यावरील ६० हजार रुपये किमतीचे वीस लोखंडी ढापे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे.
याबाबतची फिर्याद पारगावचे सरपंच बबन ढोबळे यांनी मंचर पोलिस ठाण्यात दिली.
पारगाव हद्दीत असलेल्या खार ओढा व तेथील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या देखरेखीचे काम पारगाव ग्रामपंचायतकडे दिले आहे. दरम्यान, गुरुवारी (ता.१८) रोजी सरपंच बबन ढोबळे, ग्रामपंचायत शिपाई प्रशांत जाधव हे बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी बंधाऱ्यावर असलेल्या ६० ढाप्यापैकी २० ढापे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी ग्रामसेवक के. डी. भोजने यांना कळविले व चोरीला गेलेल्या ढाप्यांचा आजूबाजूला शोध घेतला असता ते मिळून आले नाही. अज्ञात चोरट्याने ६० हजार रुपये किमतीचे २० ढापे चोरुन नेल्याचे लक्षात येताच ढोबळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00709 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..