पोंदेवाडीत ड्रोनद्वारे औषध फवारणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोंदेवाडीत ड्रोनद्वारे औषध फवारणी
पोंदेवाडीत ड्रोनद्वारे औषध फवारणी

पोंदेवाडीत ड्रोनद्वारे औषध फवारणी

sakal_logo
By

पारगाव, ता. २५ : पोंदेवाडी गावातील युवा शेतकरी नाथा रामदास वाळुंज यांनी त्यांच्या शेतातील पाच एकर क्षेत्रातील मका पिकावर ड्रोनद्वारे औषध फवारणीसाठी केली आहे. यावेळेची व पैशाची मोठी बचत झाली आहे. ड्रोनद्वारे प्रथमच फवारणी होत असल्याने हा प्रयोग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी हायटेक बनले असून आधुनिक तंत्रज्ञानाची ते कास धरू लागले आहेत. पोंदेवाडी गावाच्या परिसरातून जात असलेल्या डिंभा उजव्या कालव्यामुळे बहुतांशी शेती बागायती झाली आहे. वर्षभर शेतीला पाणी उपलब्ध होत असल्याने शेतकरी शेतात विविध प्रकारची पिके घेतात नाथा रामदास वाळुंज यांनीही पाच एकर क्षेत्रात स्वीट कॉर्न मका पिकाची लागवड केली आहे. मका पिकाची पाच ते सहा फूट वाढ झाली आहे. पिकाला अळीचा प्रादुर्भाव झाल्याने औषधाची फवारणी करणे गरजेचे होते.

नेहमीच्या पाठीवरील पंपाने फवारणी करायची झाली असती तर उंच वाढलेल्या पिकामुळे सर्व पिकांना व्यवस्थित फवारणी करता आली नसती. पाच एकर साठी संपूर्ण दिवस लागला असता या करिता नाथा रामदास वाळुंज यांनी ८०० रुपये प्रती एकर याप्रमाणे ड्रोन भाड्याने आणून फवारणी केली. संपूर्ण पाच एकरच्या फवारणीसाठी केवळ अर्धा तासच लागला.
- नाथा वाळुंज, शेतकरी

पैसे, औषध अन्‌ वेळेची बचत
ड्रोनच्या टाकीत एकावेळी १० लिटर औषध बसते १३ फूट रुंदीचे क्षेत्र एकावेळी फवारले जाते ज्या ठिकाणी औषध संपले आहे. त्याच ठिकाणावरून पुन्हा टाकीत औषध भरल्यानंतर ड्रोन पुन्हा फवारणीला सुरुवात करतो. ड्रोनद्वारे फवारणी केल्यामुळे औषध कमी लागते त्यामुळे पैशाची व वेळेची बचत झाली आहे, असे नाथा वाळूंज यांनी सांगितले.


01394

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00711 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..