पठारवस्तीवर बिबट्याची दहशत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पठारवस्तीवर बिबट्याची दहशत
पठारवस्तीवर बिबट्याची दहशत

पठारवस्तीवर बिबट्याची दहशत

sakal_logo
By

पारगाव, ता. २६ : पारगाव (ता.आंबेगाव) येथील पठार वस्तीशेजारील कांद्याच्या अरणीवर गुरुवारी (ता. २५) रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्या अर्धा तास ठाण मारून बसल्याने परिसरात बिबट्यांच्या वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट व दहशतीचे वातावरण पसरले आहे.
परिसरात वनविभागाने पिंजरा लावून देखील बिबट्या पिंजऱ्यात न जाता पिंजऱ्या शेजारील कांद्याच्या अरणीवर बसला. गुरुवारी रात्री बिबट्या येथील कांद्याच्या अरणीवर बसलेला असताना तेथून पंकज ढोबळे हे नांगरणी करून ट्रॅक्टरवरून घरी जात असताना त्यांना दोन बिबटे असल्याचे दिसून आले. एक बिबट्याने तेथून उसाच्या शेतात धूम ठोकली. तर दुसरा बिबट्या कांद्याच्या अरणीवर जाऊन बसला. ढोबळे यांनी मोबाईल मध्ये त्याचे छायाचित्र काढले. या भागात बिबट्यांचे वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. पिंजरा लावलेला असूनही बिबट्या त्याला दाद देत नसल्याने पिंजऱ्याची जागा बदलली जाईल, असे वनरक्षक साईमाला गिते यांनी सांगितले. वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता. २६) बिबट्याचा वावर असलेल्या परिसराची पाहणी केली. यावेळी सरपंच बबनराव ढोबळे, माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, माजी सरपंच खंडू ढोबळे, सचिन ढोबळे, साईमाला गिते, अशोक जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00713 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..