अवसरीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीच्या हिंगे विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवसरीच्या उपसरपंचपदी
राष्ट्रवादीच्या हिंगे विजयी
अवसरीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीच्या हिंगे विजयी

अवसरीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीच्या हिंगे विजयी

sakal_logo
By

पारगाव, ता. २६ : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शीतल सुनील हिंगे यांची निवड झाली. त्यांना नऊ मते; तर शिवसेनेच्या मनीषा रोहिदास फल्ले यांना चार मते पडली.
अवसरी बुद्रुकचे उपसरपंच सचिन हिंगे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी शुक्रवारी (ता. २६) सरपंच पवन हिले यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया झाली. या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे नऊ सदस्य आहेत; तर शिवसेनेचे पाच सदस्य आहेत. निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्वच्या सर्व नऊ सदस्यांनी हिंगे यांना मतदान केले; तर फल्ले यांना शिवसेनेच्या पाच सदस्यांपैकी चार सदस्यांनी मतदान केले. एक सदस्य गैरहजर होते. त्यामुळे हिंगे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी मोहन गरजे यांनी दिली. ग्रामपंचायत सदस्य सचिन हिंगे, स्वप्नील बांबळे, प्रशांत वाडेकर, आशा चव्हाण, वसुधा वाघमारे, माया टाव्हरे, ललिता गायकवाड, अजित चव्हाण, स्वप्निल हिंगे, कोमल हिंगे यांनी मतदान केले.
नवनिर्वाचित उपसरपंच हिंगे यांचा सत्कार भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक शांताराम हिंगे, शरद बँकेचे माजी संचालक संजय चव्हाण, सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर एलभर, सरपंच पवन हिले, सामाजिक कार्यकर्ते अनिल हिंगे, उद्योजक आशुतोष हिंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शाखा अध्यक्ष सुनील हिंगे पाटील, विलास हिंगे यांनी केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00714 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..