लोणीतील पाणीपुरवठा योजनेसाठी ११ कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणीतील पाणीपुरवठा योजनेसाठी ११ कोटी
लोणीतील पाणीपुरवठा योजनेसाठी ११ कोटी

लोणीतील पाणीपुरवठा योजनेसाठी ११ कोटी

sakal_logo
By

पारगाव, ता. २८ : लोणी (ता. आंबेगाव) येथील सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ११ कोटी २२ लाख २९ हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.

वळसे पाटील या योजनेबाबत माहिती देताना म्हणाले, की तालुक्याच्या पूर्व भागातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या लोणी परिसरात दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. काही भागात तर पाण्यासाठी टँकरची वाट पहावी लागते. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक वळसे पाटील पाटील यांनी येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेकदा पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह सर्वेक्षण केले होते. त्याच वेळी वळसे पाटील यांनी सांगितले होते कि, या भागातील पिण्याच्या पाण्यासाठी लवकरच सुधारित पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळवली जाईल. त्यानुसार पारगाव येथील घोडनदी पात्रालगत विहीर घेऊन त्यावर पाणी उपसा योजना करून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर पाइपलाइनने पाणी नेऊन तेथे एक दश लक्ष क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी शुद्धीकरण करून गलठावस्ती येथे १.५० लक्ष लिटर क्षमतेच्या उंच टाकीमध्ये हे शुध्द पाणी सोडण्यात येणार आहे. या योजनेमुळे लोणी गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार असल्याचे सरपंच ऊर्मिला धुमाळ यांनी सांगितले

01404, 01405

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00715 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..