अवसरीत सीएनजी वाहतुकीचा टेम्पो उलटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवसरीत सीएनजी वाहतुकीचा टेम्पो उलटला
अवसरीत सीएनजी वाहतुकीचा टेम्पो उलटला

अवसरीत सीएनजी वाहतुकीचा टेम्पो उलटला

sakal_logo
By

पारगाव, ता. ३० : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे मंचर-शिरूर रस्त्यावर गावालगतच्या धोकादायक वळणावर सीएनजी गॅस वाहतूक करणारा टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात टेम्पोचालक किरकोळ जखमी झाला. मात्र, टेंपोचे मोठे नुकसान झाले.
जातेगाव (ता. शिरूर) येथून गॅस भरून टेम्पो (क्र. एमएच १४ केए २८३०) येत होता. त्यावेळी मंगळवारी (ता. ३०) पहाटे पावणेएकच्या सुमारास समोरून मोटारसायकल आल्याने टेम्पो रस्त्याच्या बाजूला घेत असताना रस्त्यालगतच्या खड्ड्यात उलटला. त्यामध्ये टेम्पो चालक हेमंत बाळासाहेब थोरात (वय ३४, रा. शेवाळवाडी-मंचर, ता. आंबेगाव) हा किरकोळ जखमी झाला. मात्र, या अपघातात टेंपोचे मोठे नुकसान झाले.

उपाययोजना करणे गरजेचे
मंचर-शिरूर रस्त्यावर वळसे मळ्याकडे जाण्याऱ्या रस्त्याच्या पुढे व रोकडेवस्तीजवळ असणाऱ्या धोकादायक वळणावर वारंवार अपघात होत असून, सार्वजनिक बांधकाम विभाग अपघात रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करत नाही. याबद्दल परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या ठिकाणी वाहनाचा वेग कमी व्हावा, यासाठी गतिरोधक बसवणे, धोकादायक वळण म्हणून फलक लावणे गरजेचे आहे. या रस्त्यावर धर्मराज मंदिर ते मुक्ताबाई खिंडीपर्यंत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरु केले आहे. एस्सार पेट्रोलपंप व बसस्थानकाजवळ ठेकेदाराने खडी पांगवली आहे, परंतु या खडीमुळे मोटारसायकल घसरण्याच्या घटना घडू लागल्या आहे. त्यामुळे या दोन ठिकाणे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00721 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..