लोणी धामणी परिसरात ढगफुटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणी धामणी परिसरात ढगफुटी
लोणी धामणी परिसरात ढगफुटी

लोणी धामणी परिसरात ढगफुटी

sakal_logo
By

पारगाव, ता. ११: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, खडकवाडी व धामणी परिसरात आज रविवार सायंकाळी ढगफुटी होऊन सुमारे एक तास मुसळधार पाऊस झाला. यामुळे ओढ्या नाल्यांना पूर आला. शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर धामणी येथील गवंडीमळ्यात वीज पडून बैलगाडा शर्यतीचा एक बैल मृत्यूमुखी पडला तर पुरामुळे पुलावरून पाणी वाहू लागल्याने पारगाव लोणी रस्त्यावरील दळणवळण ठप्प झाले.
धामणी परिसरात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. लोणीच्या डोंगरभाग तसेच धामणीच्या धनगरदरा परिसरात ढगफुटी झाल्याने शेताचे बांध फुटले. अनेक ठिकाणी शेतातील पिके पाण्याबरोबर वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लोणी गावालगत पारगाव लोणी रस्त्यावरील ओढ्याला पूर येऊन पुलावरून पाणी वाहत असल्याने या रस्त्यावरील दळणवळण ठप्प झाले होते. मोटारसायकलवरून चाललेला तरुण पुराच्या पाण्यात अडकला व पुराबरोबर मोटारसायकलसह वाहत चालला असता तरुणांनी तत्परता दाखवून त्याला पुराच्या बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. रात्री उशीला पूर ओसरल्यानंतर वहातूक पूर्ववत सुरू झाली. लोणी परिसरात शेतातील पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक आदक पाटील यांनी केली. खडकवाडी परिसरातही पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या भागातही नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी सरपंच अनिल डोके व उपसरपंच एकनाथ सुक्रे यांनी केली आहे.

धामणी येथील गवंडी मळ्यात नामदेव महादू गवंडी यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळील झाडावर वीज पडल्याने गोठ्यातील शर्यतीचा बैल जागीच ठार झाल्याने गवंडी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शासनाने पंचनामा करून गवंडी यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी सरपंच सागर जाधव यांनी केली आहे. धामणी गावालगतच्या ओढ्याला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक विस्कळित झाली होती.

01455

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00741 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..