लोणी, खडकवाडीरात पिकांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणी, खडकवाडीरात पिकांचे नुकसान
लोणी, खडकवाडीरात पिकांचे नुकसान

लोणी, खडकवाडीरात पिकांचे नुकसान

sakal_logo
By

पारगाव, ता. १२ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, खडकवाडी व धामणी, शिरदाळे परिसरात रविवार सायंकाळी ढगफुटी होऊन मुसळधार पाऊस झाल्याने ओढ्या नाल्यांना पूर आल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सुचनेवरून आज (ता.१२) पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी नुकसानीची पाहणी केली.
प्रशासनाने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी यासाठी आग्रही मागणी केली आहे. धामणी येथील गवंडीमळ्यातील शेतकरी नामदेव गवंडी यांच्या शर्यतीचा बैल जागीच ठार झाल्याने झाला. या घटनास्थळी वळसे पाटील यांनी भेट देऊन तहसीलदार रमा जोशी यांना भ्रमणध्वनीवरून फोन करून संबंधित शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर.एस. भुरे यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, शरद सहकारी बँकचे संचालक अशोक आदक पाटील, धामणीचे सरपंच सागर जाधव, बाळशीराम वाळुंज, सोसायटीचे अध्यक्ष सतीश जाधव, आनंदा जाधव, गणेश तांबे, शिरदाळेचे उपसरपंच मयूर सरडे, प्रतीक जाधव, सोमनाथ जाधव, निवृत्ती तांबे उपस्थित होते. पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले यांनीही प्रांतअधिकारी सारंग कोडलकर यांना भ्रमणध्वनीवरून फोन करून शेतकरी नामदेव महादू गवंडी यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, शिरदाळे येथील पावसामुळे झालेल्या बटाटा पिकाचीही वळसे पाटील यांनी पाहणी केली.

01458

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00743 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..