दहशत निर्माण करणाऱ्यांवर भागडीमध्ये कारवाईची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहशत निर्माण करणाऱ्यांवर
भागडीमध्ये कारवाईची मागणी
दहशत निर्माण करणाऱ्यांवर भागडीमध्ये कारवाईची मागणी

दहशत निर्माण करणाऱ्यांवर भागडीमध्ये कारवाईची मागणी

sakal_logo
By

पारगाव, ता. १४ : भागडी (ता. आंबेगाव) येथे काही व्यक्ती सार्वजनिक कार्यक्रम, उत्सवांमध्ये जाणीवपूर्वक शिवीगाळ करून दहशत निर्माण करीत आहे, त्यामुळे पोलिसांनी संबंधितांना सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रतिबंध करावा, तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सरपंच गोपाळ गवारी यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण, उपविभागीय पोलिस अधिकारी, पारगाव पोलिस ठाणे यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

सरपंच गवारी यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. यावेळी नितीन आगळे, संदीप आदक, अर्जुन बराटे, दिनेश थिटे, किरण आगळे, दिनकर उंडे उपस्थित होते.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, वैभव नामदेव उंडे व विनायक नामदेव उंडे यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये गावात ध्वनीवर्धकाला बंदी असतानाही मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक लावून इतर मंडळांना दडपशाहीने धमकी दिली आहे. याबाबत विचारणा केली असता मला व माझा मुलगा अक्षय गवारी याला धक्काबुक्की करीत शिवीगाळ केली आहे. त्यासंदर्भात पारगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

यासंदर्भात वैभव उंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, विसर्जन मिरवणुकीत जाणूनबुजून आमच्या गटाच्या महिला ग्रामपंचायत सदस्याच्या पतीला विरोधी गटाकडून धक्काबुक्की केली जात असताना मी फक्त ते भांडण सोडविण्यासाठी गेलो असता राजकीय द्वेषातून माझे व माझ्या भावाचे नाव त्यात गोवण्यात आले आहे. आम्ही कोणालाही मारहाण केली नाही व आमचा त्या घटनेशी काडीचाही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00745 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..