घारगावला लम्पी आजारावर जनावारांसाठी लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घारगावला लम्पी आजारावर 
जनावारांसाठी लसीकरण
घारगावला लम्पी आजारावर जनावारांसाठी लसीकरण

घारगावला लम्पी आजारावर जनावारांसाठी लसीकरण

sakal_logo
By

पारगाव, ता. १५ : पारगाव (ता. आंबेगाव) येथे लम्पी या आजारांवर शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने लसीकरण शिबीराचे आयोजन केले आहे.
पारगाव परिसरातील सर्व वाड्यावस्तीवर पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सर्व गाय, म्हैस, बैल यांना लंम्पी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पारगाव परिसरासाठी लसीचे ११०० डोस उपलब्ध झालेले असून सर्व जनावरांना लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. नागेश पुरी यांनी दिली. तसेच लंम्पी आजारावर घ्यावयाच्या काळजीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शरद सहकारी बँकेचे संचालक दौलत लोखंडे, सरपंच बबनराव ढोबळे, माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, डॉ.अजय कोल्हे, डॉ. दयानंद किदर्ले, डॉ. नम्रता आंबेकर, डॉ. अमोल तळेकर, डॉ. प्रकाश शिंदे, संदीप बढेकर, निवृत्ती थोरात, तेजेश थोरात, राहुल ढोबळे, सुनील थोरात, ज्ञानेश्वर ढोबळे, गबाजी ढोबळे, तुषार थोरात आदी पशुपालक शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00746 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..