अवसरी येथे बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवसरी येथे बिबट्याचा
पाळीव कुत्र्यावर हल्ला
अवसरी येथे बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला

अवसरी येथे बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला

sakal_logo
By

पारगाव, ता. १५ : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे मागील काही आठवड्यांपासून बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर वारंवार हल्ले होत आहेत. गुरुवारी (ता. १५) पहाटे अडीचच्या सुमारास भोकरशेत वस्तीवरील चेतन हिंगे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. वनविभागाने या परिसरात तातडीने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
येथील भोकरशेत वस्तीवर गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास चेतन हिंगे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. कुत्र्याच्या आवाजाने हिंगे जागे झाले म्हणून कुत्रा बचावला. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. येथे दोन दिवसांपूर्वी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष सर्जेराव हिंगे पाटील यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला होता. त्याच्या आवाजामुळे हिंगे हे जागे झाले व त्यांनी बिबट्याला पळवून लावले.
पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचारी वसाहतीजवळ गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास सुरक्षा कर्मचारी सागर हिंगे, अविनाश गावडे, अविनाश धायबर व विलास बढे हे गस्तीवर असताना त्यांना बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला. त्यांनी बॅटरीच्या उजेडात पाहिल्यावर बिबट्या झाडीत लपलेला दिसला. सागर हिंगे यांनी बिबट्याचे मोबाईल चित्रीकरण केले. या सर्वांनी दगडी फेकून बिबट्याला पळवून लावले.

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00749 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..