खडकवाडीत रब्बी हंगामाबाबत मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खडकवाडीत रब्बी हंगामाबाबत मार्गदर्शन
खडकवाडीत रब्बी हंगामाबाबत मार्गदर्शन

खडकवाडीत रब्बी हंगामाबाबत मार्गदर्शन

sakal_logo
By

पारगाव, ता. ३ : खडकवाडी (ता. आंबेगाव) येथे रब्बी हंगाम प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र (नारायणगाव) यांच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली, मंडळ कृषी अधिकारी पी. बी. जाधव यांच्या नियोजनानुसार निरगुडसर मंडळ कार्यक्षेत्रातील गावांमध्ये रब्बी हंगाम प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत ज्वारी व कांदा या पिकांविषयी कृषी विज्ञान केंद्र (नारायणगाव) येथील शास्त्रज्ञ गावडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांना पिकांचा तंत्रज्ञान प्रसार, मूल्यासाखळी बळकटीकरण, विविध योजना या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश याविषयी कृषी सहायक एन. एस. शेळके यांनी मार्गदर्शन केले. कृषिक ॲपचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच अनिल डोके, उपसरपंच एकनाथ सुक्रे, गुलाब वाळुंज, दिलिप डोके , आदिनाथ सुक्रे, अनिता धुमाळ, कृषी सहायक सी. टी. शिंदे, आर. ए. केंगारे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
......

01542