तरुणांचे ऊर्जापीठ असणारा नेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणांचे ऊर्जापीठ असणारा नेता
तरुणांचे ऊर्जापीठ असणारा नेता

तरुणांचे ऊर्जापीठ असणारा नेता

sakal_logo
By

..........................................................................................................................
''दिलीप'' या नावाप्रमाणेच साहेब म्हणजे एक प्रकाशमान असे व्यक्तिमत्त्व. मळवाटेने न जाता वेगळी वाट चोखाळत आणि आव्हानात्मक काहीतरी करून दाखवायचे...हा साहेबांचा जन्मजात स्वभाव. कमालीची राजकीय परिपक्वता असणं हे साहेबांचं आणखी एक वैशिष्ट्य राहिले आहे. राजकीयदृष्ट्या परिपक्व, स्थितप्रज्ञ, संयमी असणाऱ्या साहेबांना जेव्हा अत्यंत अस्थिर, संवेदनशील आणि आव्हानात्मक अशा ऊर्जा खात्याची जबाबदारी मिळाली तेव्हा साहेबांच्या परिपक्वतेचा खरा परिचय महाराष्ट्राला झाला. अभ्यासपूर्ण नियोजनातून या खात्याला स्थिरता आणत एक आश्वासक आणि गतिमान काम साहेबांनी या निमित्ताने करून दाखवले होते. त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
- रामदास वळसे पाटील, माजी उपसरपंच, निरगुडसर (ता. आंबेगाव)
..........................................................................................................................

ऊर्जा खात्याला ऊर्जितावस्था आणून दिली
जून २००५ मध्ये वीज महामंडळाचे विभाजन करण्यात येऊन सुमारे ६६ हजार कोटींची गुंतवणूक करीत महानिर्मिती, महावितरण, महापारेषण अशा तीन कंपन्या अस्तित्वात आणल्या. जे काम अशक्यप्राय किंवा कल्पनेपलीकडचे होते, ते साहेबांनी आपले कौशल्य पणाला लावत शक्य करून दाखवले. आज महाराष्ट्राला विजेच्या बाबतीत जी स्थिरता प्राप्त झाली आहे...त्यामागे साहेबांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. महाराष्ट्राच्या ऊर्जा खात्याला ऊर्जितावस्था आणून देणारे साहेब आज तरुणांचे उर्जापीठ बनले आहेत.

शैक्षणिक क्षेत्रात धाडसी निर्णय
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री या नात्याने साहेबांनी शैक्षणिक क्षेत्रात धाडसी निर्णय घेतले. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील गुंतागुंत कमी करून, त्यात पारदर्शकता आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. आय.टी.आय.सारखा अभ्यासक्रम दोन शिफ्टमध्ये सुरू करण्याचा निर्णय असो किंवा अभियांत्रिकी शिक्षणाचे जाळे अगदी ग्रामीण भागात पोहोचविण्याचे कार्य असो. साहेबांनी घेतलेल्या अशा निर्णयांमुळे राज्यात सौहार्दपूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे. साहेबांनी केलेले हे कार्य कोणताही तरुण दृष्टीआड करत नाही.

तंत्रज्ञान क्षेत्रात पायाभरणी केली
ज्येष्ठ शात्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर म्हणतात आजच्या एकविसाव्या शतकात कोणत्याही समाजाला प्रगतीकडे नेणारी सर्वात महत्वाची क्षेत्रे कोणती असतील तर ती म्हणजे ऊर्जा व शिक्षण. मी योगा योगावर विश्वास ठेवत नाही, पण शतकाच्या सुरुवातीलाच दिलीप वळसे पाटील यांच्याकडे नेमकी हीच खाती असावीत हा योगायोग विलक्षण आहे. जागतिकीकरण, ज्ञानाधिष्ठित समाज, माहिती युगातील उद्योजगता या शब्दांतील संकल्पना नेमक्या ज्यांना समजल्या आणि त्या अनुषंगाने महत्त्वाची कामगिरी बजावली, त्यात दिलीप वळसे पाटीलजी अग्रेसर आहेत. शिक्षणात संगणक साक्षरता, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्रातील तरुण अग्रेसर राहावा म्हणून अत्यंत दूरदृष्टीपणाने ''महाराष्ट्र राज्य ज्ञान महामंडळाची स्थापना वळसे पाटील यांनी केली. महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे आहे, त्याची पायाभरणी त्यांनी केली आहे. रसायनतंत्रशास्त्र सारख्या संस्थांना स्वायत्तता प्रदान करून संशोधन व अन्य क्षेत्राला चालना देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून वळसे पाटील नेहमीच आदरास पात्र ठरणार आहेत.

एक ऊर्जावान व्यक्तिमत्त्व
जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी साहेबांविषयी जे लिहून ठेवले आहे....ते पाहता येथील तरुणांसाठी साहेब निश्चितच ऊर्जास्रोत ठरले आहेत. ख्यातनाम कवी, लेखक, शेतीतज्ञ ना.धो.महानोर यांनी साहेबांविषयी एक अनुभव सांगितला आहे. ते म्हणतात शरदराव पवार साहेबांचे व्यक्तिगत सचिव म्हणून दिलीप वळसे पाटील काम पाहत. प्रचंड ताण असायचा. पुढारी, नेते यांच्याकडून होणारा किती किती त्रास वळसे पाटील यांना सहन करावा लागायचा.पण त्यांनी अथकपणे पवारसाहेबांनी सांगितल्या पेक्षाही अधिक वेगाने कामे केली. स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचे काम मा. शरद पवारसाहेबांनी पुढे नेले आहे. पवार यांच्यासोबत राजकारण, समाजकारण करणारे गेल्या पन्नास वर्षांत असंख्य होते, आहेत. परंतु ते आत्मसात करून, पुढे घेऊन चालण्यात स्वतःचे बळ व जाणते पण असावे लागते. ते क्वचित सापडते. जी महत्त्वाची नावे आज आहेत, त्यात हे गुण सर्वार्थाने वृद्धिंगत केलेले दिलीपराव आहेत. हजार अंगांनी भेडसावणाऱ्या वीज खात्याला अगदी झपाटल्यासारखे काम, परिश्रम, संयम ठेवत पुढे वाटचाल करत राहणारे दिलीपराव म्हणजे खरोखर एक ऊर्जावान व्यक्तिमत्त्व आहे.

भरभरून संगीताबद्दलची आवड : वाडकर
प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर म्हणायचे, प्रिय मित्र दिलीपराव यांच्या प्रशंसेसाठी मनाचा मोठेपणा कधीच कमी होणार नाही. पण शब्द मात्र नक्कीच कमी पडतील. अत्यंत जबाबदार आणि खूपच शांत व्यक्तिमत्त्व व तोंडभरून गोड बोलण्याची, पण त्यात दडलेली एखादी गुगली जी समोरच्याच्या लक्षात आलीय की नाही हे बघत बघत जराशी मान डोलताना त्यांची मूर्ती फारच देखणी दिसते. माझ्याबद्दल प्रेम, आदर आणि माझ्या संगीताबद्दलची त्यांची आवड ही त्यांच्या नजरेत मला नेहमीच भरभरून दिसते.

विकासाचा ध्यास घेणारे द्रष्टे व्यक्तिमत्त्व
राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राची स्थापना करून ग्रामीण व गरीब जनतेला शिक्षण व आरोग्य सेवा. आदिवासी विकास प्रकल्प योजना, दूध संस्थांचे जाळे उभे करणे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची स्थापना, शरद सहकारी बँकेवर १९८३ पासून संचालक, राज्य सहकारी बँकेचे संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे कौन्सिल सदस्य, वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष, आदी खूप साऱ्या आस्थापनेत केवळ पदे भूषविली नाहीत तर आपल्या प्रभावी कार्यपद्धतीने साहेबांनी या सर्व क्षेत्रात एक स्वयंशिस्त निर्माण केली आहे. विकासाचा ध्यास घेणारे द्रष्टे व्यक्तिमत्त्वच असे काम करू शकते. म्हणूनच उभ्या महाराष्ट्रात दिलीप वळसे पाटील हे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. संदर्भ म्हणून साहेबांचे नाव घेणाऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळा आत्मविश्वास दिसतो .आपल्यालाही असेच काहीतरी अचाट, अफाट, विलक्षण, उत्तुंग, विराट करून दाखवायचे आहे,असा आशावाद साहेबांविषयी बोलणाऱ्यातून जाणवतो.

पक्षीय राजकारणात आज तत्त्व लोप पावत चालली आहेत. निष्ठा राहिल्या नाहीत. अशा परिस्थितीत मा. दिलीपराव वळसे पाटील साहेबांचे राजकारणातील स्थान आदरपूर्वक व निश्चित अधोरेखित होते. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!