चतुरस्र व्यक्तिमत्त्व : माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चतुरस्र व्यक्तिमत्त्व : माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील
चतुरस्र व्यक्तिमत्त्व : माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील

चतुरस्र व्यक्तिमत्त्व : माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील

sakal_logo
By

कोरोना महामारी ही जागतिक समस्या बनली होती. महाराष्ट्रही त्या समस्येला अपवाद ठरला नाही. उद्योगांचे हाल झाले. रोजगार गेले. आर्थिक संकटाची चाहूल लागली. पण शासनाच्या भूमिकेतून कामगारमंत्री या नात्याने धोरणात्मक निर्णय घेत नोंदणीकृत कामगारांना त्यांच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये या महामारीच्या काळात जमा करण्याची महत्त्वाची भूमिका घेतलीत आणि इथल्या कामगाराला स्थैर्य दिले. चतुरस्र व्यक्तिमत्त्व असलेल्या दिलीप वळसे पाटील यांना ६६ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
- सुदाम बिडकर, अवसरी खुर्द
................................................................
कामगारमंत्री या नात्याने केवळ एक वर्ष कार्यभार सांभाळताना या एक वर्षात आपण लाखो प्रपंचांना आश्वस्त केलेत. राज्यात पोलिस महासंचालक ते पोलिस शिपाई अशी पदांची क्रमवारी साधारणपणे १५/१६ च्या घरात आहे. संबंधित पदावर रुजू होणाऱ्या प्रत्येकाला किमान वन स्टेप प्रमोशनचा धोरणात्मक निर्णय गृहमंत्री पदावर कार्यरत असताना आपण घेतलात. विशेष म्हणजे पोलिस शिपाई या पदावर रुजू होणारा कर्मचारी निवृत्त होताना तो फौजदार असेल... असा निर्णय घेताना त्याची आर्थिक स्थिती उंचवतानाच मान सन्मानही मिळेल, अशी गौरवास्पद तरतूद आपण केलीत. कोरोना काळात महाराष्ट्र पोलिसांनी जे ठळक कार्य केले आहे, त्याला तोड नाही.
एका उत्कृष्ट प्रशासकाच्या भूमिकेतून आपण त्यांच्या कार्याची पावती त्यांना दिलीत. आपल्या या निर्णयाचे केवळ पोलिस दलातच नव्हे तर सबंध महाराष्ट्रात कौतुक झाले.
माजी राज्यपाल (महाराष्ट्र राज्य)यांचे हस्ते चॅम्पियन ऑफ चेंज महाराष्ट्र पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीत महत्वाचा वाटा उचलणारे म्हणून हा महाराष्ट्र नेहमीच आपली दखल घेत राहील. एखादे पद, क्षेत्र किंवा विभाग(खाते) ह्याला उंची कशी प्राप्त करून द्यावी...हे आपल्याकडून शिकण्यासारखे आहे.एखाद्या खात्यामुळे माणसाला उंची प्राप्त होते की, एखाद्या माणसामुळे खात्याला उंची प्राप्त होते...हे नाही माहीत. पण एक मात्र नक्की...प्रामाणिक कर्तृत्वामुळे माणसाला उंची व संबंधित क्षेत्राचे वेगळेपण मात्र नक्कीच अधोरेखित होत असते. उच्च व तंत्र शिक्षण खाते, ऊर्जा खाते सांभाळत असताना आपण जे कार्य केले. त्याची दखल जाणकार महाराष्ट्र नेहमीच घेईल. संकटात असलेल्या ऊर्जा विभागाला ऊर्जा देण्याचे काम आपण केलेत. वीज कंपनी चार विभागात विकेंद्रित केलीत. नियोजन व व्यवस्थापनात सुरळीतपणा आणलात. खूप धाडसी पाऊल होते हे... आपण हा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेण्यासाठी अभ्यासपूर्ण सादरीकरण केले होते.आम्ही साक्षीदार आहोत त्या घटनेचे.
तेव्हाच आम्हाला प्रश्न पडला होता....आपण राजकारणी आहात की आय.आय. टी.मधून शिक्षण घेऊन...पुढे भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन नियुक्त झालेले एक सर्वज्ञ प्रशासक आहात !!!
उच्च व तंत्रशिक्षण खात्याची जबाबदारी सांभाळत असताना महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एम के सी एल)स्थापन केलेत. महाराष्ट्रात संगणक साक्षरतेची मुहूर्तमेढ आपण रोवलीत.
एक काळ असा होता की, विधानसभा अध्यक्षपद घ्यायला कोणी इच्छुक नसे.आपण या पदाची महत्त्व आपल्या कार्य शैलीतून वाढवलीत. त्यानिमित्ताने आपल्यातील कायदेतज्ज्ञ उभ्या महाराष्ट्राने पाहिला. महाविकास आघाडीच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आपण एक दिवसासाठी अध्यक्ष झालात; पण त्याची परिणीती अशी की, कोरोना महामारीच्या काळात उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार कार्यरत राहिले.

विश्वासदर्शक ठरावाचा ते दिवस आजही आठवतात. सबंध महाराष्ट्राच्या नजरा विधानसभेकडे होत्याच, भारतीय राजकारण्यांच्याही नजरा लागलेल्या होत्या. हंगामी अध्यक्ष या नात्याने का होईना... पण आपण अभ्यास करूनच विधानसभेत पाऊल टाकले होते. कायदेशीर भूमिका मांडून स्थिर सरकार देणे हे काम उत्कृष्ट प्रशासकाच्या भूमिकेतून आपण केलेत. आपण राज्य उत्पादन शुल्क व कामगार अशी खाती केवळ एक वर्षभर सांभाळली, असे म्हणण्यापेक्षा त्या खात्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिलीत. हे खरे. कोविड १९ चे
संकट असताना आणि त्याअनुषंगाने राज्य आर्थिक अडचणीत असताना कोट्यवधी रुपयांचे उत्पादन शुल्क/महसूल राज्याला कसे मिळेल...याची काळजी आपण कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात ठेऊन घेतलीत. अर्थ खात्याचा कारभार पाहत असताना महाराष्ट्रात शेतकऱ्यांना सुमारे ३१,००० कोटींची कर्जमाफी आपण दिली होती, तेही नियोजनपूर्वक. एखाद्या खात्याचा मंत्री हा नाममात्र नसतो, हे आपण आपल्या कार्यातून दाखवले आहे. एखादी दुर्लक्षित पण भविष्याचा वेध घेणारी योजना मंत्रिमंडळासमोर मांडणे., ती मंत्रिमंडळाच्या गळी उतरवणे आणि प्रशासनाकडून त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे सोपे नसते...हे आपण करून दाखवले आहे. सामान्यपणे आमदार आपल्याला कोणते खाते मिळेल, याची वाट पाहत असतात. याउलट मंत्रिमंडळातील विविध खात्यांची कार्यालये आपली वाट पाहत आहेत, असे वाटते. उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, ऊर्जा, अर्थ, विधानसभा अध्यक्ष, राज्य उत्पादन शुल्क, कामगार आणि गृह.
राजकारणातील, समाजकारणातील आपली उंची किती यापेक्षा आपण जेथे काम करता त्या क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व/उंची प्राप्त होते, हे मात्र नक्की. माळीण घटना, मांढरदेव घटना आपण ज्या आत्मीयतेने हाताळल्या,त्या आजही आठवल्या की,आपल्यातील माणुसकीचे दर्शन होते. कळत नकळत आपल्याप्रती हात जोडले जातात. राष्ट्रीय साखर महासंघाचे आपण अध्यक्ष होतात. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष आहात. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक आहात. रयत शिक्षण संस्थेचे कौन्सिल सदस्य आहात.
राज्य व जिल्हा सहकारी बँकेत आपण कार्यरत आहात. भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट आपण सांभाळलेत.

कृषिमाल, दूध, कांदा, बटाटा, बाजार समित्या, सहकार या साऱ्या गोष्टींवर प्राधान्यक्रमाने आपण नेहमीच अभ्यासपूर्वक शासनाकडे पाठपुरावा केला आहे. राजकारणी हा आपल्यासारखा उत्कृष्ट प्रशासक असेल तर मंत्रालय की सचिवालय असा वादच उभा राहणार नाही. विकसित व आधुनिक राज्याच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल होईल...हे नक्की.
आपल्या योगदानाची, कार्याची पर्यायाने आपली आम्हाला आवश्यकता आहे. पुनश्च एकदा आपणाला वाढदिवसानिमित्त मनः पूर्वक शुभेच्छा. आपल्या आचरणातून एक नक्की शिकायला मिळते ते म्हणजे...

अनुभवाने एक शिकवण दिली आहे,
कुणाच्या चुका, उणिवा शोधत बसू नका.
नियती बघून घेईल, हिशोब तुम्ही करू नका.
काही जिंकणं बाकी आहे,
काही हरणं बाकी आहे.
अजूनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे.
आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे...
आपण पहिल्या पानावर आहोत, अजून संपूर्ण पुस्तक बाकी आहे.