‘भीमाशंकर’कडून ऊसतोड मजुरांना किराणाचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘भीमाशंकर’कडून ऊसतोड मजुरांना किराणाचे वाटप
‘भीमाशंकर’कडून ऊसतोड मजुरांना किराणाचे वाटप

‘भीमाशंकर’कडून ऊसतोड मजुरांना किराणाचे वाटप

sakal_logo
By

पारगाव, ता. २४ : दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर साखर कारखान्याचा सन २०२२-२३ गळीत हंगाम सुरु झाला असून ऊस तोडणीसाठी ऊसतोड मजूर कारखान्यावर दाखल झाले आहेत. परंतु, सुरु असलेल्या परतीच्या पावसाने या ऊसतोड मजुरांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून कारखान्याच्या वतीने साडेपाच हजार कामगारांना भोजन देण्यात आले. तसेच कारखान्याच्या वतीने दिवाळी किराणा त्यामध्ये तेल, साखर, रवा, तांदूळ, डाळ, मीठ, मसाले आदींचे वाटप करण्यात आहे.
भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक-संचालक व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या सुचनेनुसार ऊसतोडीसाठी आलेल्या चार हजार कुटुंबातील ऊसतोड मजुरांना दिवाळी किराणा वाटप कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले, बाबासाहेब खालकर, ज्ञानेश्वर अस्वारे, मच्छिंद्र गावडे, नितीन वाव्हळ, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, शिरीष सुर्वे, किशोर तिजारे, सचिव रामनाथ हिंगे, राजेश वाकचौरे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, कामगार कल्याण अधिकारी चंद्रशेखर मगर, ब्रिजेश लोहोट, अनिल बोंबले, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे उपस्थित होते.