चार्जिंगला लावलेल्या तीन मोबाईलची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार्जिंगला लावलेल्या
तीन मोबाईलची चोरी
चार्जिंगला लावलेल्या तीन मोबाईलची चोरी

चार्जिंगला लावलेल्या तीन मोबाईलची चोरी

sakal_logo
By

पारगाव, ता. २९ : पारगाव (ता. आंबेगाव) येथे घरात चार्जिंगला लावलेले सुमारे १४ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईलची चोरी झाली.
पारगाव कारखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारगाव येथील भीमाशंकर कारखान्याच्याशेजारी रवी नामदेव चव्हाण (मूळ गाव मनगुळी, ता. बसवन भागेवाडी, जि. विजापूर, कर्नाटक) यांचे पत्र्याचे उघडे घर आहे. त्यांच्या घरातून गुरुवार (ता. २७) पहाटे १२.३० ते सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चार्जिंगला लावलेला प्रत्येकी तीन हजार रुपये किमतीचे दोन व आठ हजार रुपये किमतीचा एक, असे एकूण १४ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरून नेले.