कार्तिक स्नान सोहळ्याचा धामणीतील मंदिरात समारोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार्तिक स्नान सोहळ्याचा
धामणीतील मंदिरात समारोप
कार्तिक स्नान सोहळ्याचा धामणीतील मंदिरात समारोप

कार्तिक स्नान सोहळ्याचा धामणीतील मंदिरात समारोप

sakal_logo
By

पारगाव, ता. ८ : धामणी (ता. आंबेगाव) येथील श्री संत सावता महाराज मंदिरात आश्विन ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा असा महिनाभर भक्तिमय वातावरणात सुरू असलेला काकडा कार्तिक स्नान सोहळ्याचा समारोप मंगळवारी (ता. ८) उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सालाबादप्रमाणे याही वर्षी भाविकांनी महिनाभर मंदिरामध्ये उपस्थित राहून जुनी पारंपरिक प्रथा खंडित न करता काकडा आरती सोहळ्याला उपस्थिती लावली.

माळी समाजाचे अध्यक्ष व उद्योजक ज्ञानेश्वर विधाटे यांच्यावतीने संपूर्ण महिनाभर दररोज पहाटे येणाऱ्या सर्व काकडा सेवेकरी महिला व पुरुषांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली. ज्ञानज्योती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप भूमकर यांच्यावतीने मिठाईचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी ज्ञानज्योती शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुनीता विधाटे, उपाध्यक्ष प्रदीप भूमकर, श्री शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रेय गायकवाड, गणपत विधाटे, बाळासाहेब विधाटे, अंकुश भूमकर, सोपान महाराज विधाटे, संदीप महाराज भूमकर, बाळू आमाप, जगन विधाटे, सीताराम भूमकर, काळूराम विधाटे, राजाराम विधाटे, संतोष भूमकर व भाविक उपस्थित होते. माळी महासंघाचे आंबेगाव तालुकाध्यक्ष अक्षय विधाटे यांनी सूत्रसंचालन केले.