''साई हेलपिंग''तर्फे २०० कुटुंबांना मायेची ऊब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''साई हेलपिंग''तर्फे २०० कुटुंबांना मायेची ऊब
''साई हेलपिंग''तर्फे २०० कुटुंबांना मायेची ऊब

''साई हेलपिंग''तर्फे २०० कुटुंबांना मायेची ऊब

sakal_logo
By

पारगाव, ता. १० : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पोंदेवाडी, पारगाव भीमाशंकर साखर कारखाना परिसर, निरगुडसर आणि अवसरी खुर्द परिसरात ऊसतोड मजुरांच्या २०० कुटुंबांना साई हेलपिंग हॅन्ड्स या संस्थेच्या वतीने २०० ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले. कडाक्याच्या थंडीमध्ये मिळालेल्या मायेच्या ऊबीमुळे मजूरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
साई हेलपिंग हॅन्ड्सच्या वतीने पोंदेवाडी येथील ७० ऊस तोडणी कामगारांची कुटुंब, पारगाव येथील ९० ऊस तोडणी कामगार कुटुंब, निरगुडसर येथील २० कुटुंब, अवसरी येथील १० फासेपारधी कुटुंब तसेच रस्त्यावरील १० मजूर यांना त्यांच्या कोप्यांवर तसेच शेतात जाऊन ब्लँकेट्स देण्यात आले. यावेळी आयआरबीचे सरव्यवस्थापक आणि साई हेलपिंग हॅन्ड चे सदस्य रवींद्र वायाळ, मनोज सन्याशीव उपस्थित होते.
सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला आहे. तालुक्यातील पूर्व पट्यात विविध ठिकाणी या कामगारांनी उसाच्या पाचटाचे झोपडी तसेच ताडपत्रीचे घर उभारले आहे. थंडीच्या काळात या पालामध्ये खूप थंडी जाणवते. या कामगारांना थंडीपासून बचाव होण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचे रवींद्र वायाळ यांनी सांगितले.


01673