खडकवाडीत बिबट्याकडून दोन शेळ्या ठार, एक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खडकवाडीत बिबट्याकडून
दोन शेळ्या ठार, एक जखमी
खडकवाडीत बिबट्याकडून दोन शेळ्या ठार, एक जखमी

खडकवाडीत बिबट्याकडून दोन शेळ्या ठार, एक जखमी

sakal_logo
By

पारगाव, ता. २३ : खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील शेतकरी हनुमंत बाळा सुक्रे यांच्या घरालगत असणाऱ्या गोठ्यावर मंगळवारी (ता. २२) मध्यरात्री बारा ते एकच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. त्यात दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून, एक शेळी जखमी झाली. त्यामुळे त्यांचे सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले.
या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक साईमाला गिते व वनकर्मचारी बाळासाहेब आदक यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य ती लवकरात लवकर भरपाई द्यावी, अशी मागणी खडकवाडीचे माजी सरपंच अनिल डोके, उपसरपंच एकनाथ सुक्रे, गुलाब वाळुंज, ग्रामसेवक संतोष तुळेकर यांनी वन विभागाकडे केली.
दरम्यान, खडकवाडी परिसरात बिबट्या व इतर वन्य प्राण्यांसाठी वाढत्या ऊस क्षेत्रामुळे लपण व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे बिबट्याचे या परिसरात नेहमीच वास्तव्य असते. सर्व शेतकरी व पशुपालक यांनी सतर्क राहावे तसेच जनावरांना सुरक्षित जागी निवारा द्यावा, असे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.