''भीमाशंकर''च्या दोन लाख पोत्यांचे पूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''भीमाशंकर''च्या दोन लाख पोत्यांचे पूजन
''भीमाशंकर''च्या दोन लाख पोत्यांचे पूजन

''भीमाशंकर''च्या दोन लाख पोत्यांचे पूजन

sakal_logo
By

पारगाव, ता. ३ : दत्तात्रेयनगर (पारगाव ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०२२-२३ मधील उत्पादित दोन लाख २१ हजार पोत्याचे पूजन कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, अरुण चासकर, अक्षय काळे, बाजीराव बारवे, सीताराम लोहोट, ज्ञानेश्वर अस्वारे, नितीन वाव्हळ, रामहरी पोंदे, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे तसेच अधिकारी व कर्मचारी हजर होते.
कारखान्याचे संस्थापक व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गळीत हंगाम सुरू असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नोंद असलेल्या सर्व उसाचे गाळप यशस्वीरीत्या करण्यात येईल. तरी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर साखर कारखान्यास ऊस देवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी केले.

01732