आंबेगावात कांदा लागवडीसाठी मजुरांची टंचाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगावात कांदा लागवडीसाठी मजुरांची टंचाई
आंबेगावात कांदा लागवडीसाठी मजुरांची टंचाई

आंबेगावात कांदा लागवडीसाठी मजुरांची टंचाई

sakal_logo
By

पारगाव, ता. १३ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामातील कांदा लागवड जोमात सुरू आहे. यावर्षी बाजारभाव चांगला मिळेल या अपेक्षेने कांदा लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र लागवडीसाठी महिला मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे. शेतकऱ्यांना वाहनातून लांबून मजूर आणावे लागत आहे. यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील घोडनदीच्या काठावर तसेच डिंभा उजव्या कालव्यालगत असलेल्या अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, पारगाव , जारकरवाडी, पोंदेवाडी, खडकवाडी, वाळुंजनगर, काठापूर बुद्रुक, देवगाव, लाखणगाव या गावात खरीप व रब्बी हंगामात कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून देणारे कांदा हे नगदी पीक असल्याने शेतकर्यांचा कांदा लागवडी कडे कल वाढला आहे त्यामुळे सर्वत्र कांदा लागवड सुरु असल्याने शेतमजुरांचा तुटवडा भासत आहे. शेतकऱ्यांना वाहन पाठवून लांबून जिरायती गावातून मजुर आणावे लागत आहे वाहनासाठी दररोज अंतरानुसार एक हजार ते दीड हजार भाडे द्यावे लागत आहे एक महिलेला कांदा लागवडीसाठी ३०० रुपये मजुरी द्यावे लागते एक एकर क्षेत्रातील कांदा लागवड करण्यासाठी १४ ते १६ महिला मजूर लागतात त्यामुळे शेतकऱ्यांना मजुरांच्या तुटवड्यामुळे मजुरीवर जास्त खर्च करावा लागत असल्याचे वाळुंजनगर येथील कांदा उत्पादक शेतकरी व कांदा व्यापारी महेंद्र वाळुंज यांनी सांगितले.
01780