पोलिस असल्याची बतावणी करत सोन्याची चैन लांबवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस असल्याची बतावणी करत सोन्याची चैन लांबवली
पोलिस असल्याची बतावणी करत सोन्याची चैन लांबवली

पोलिस असल्याची बतावणी करत सोन्याची चैन लांबवली

sakal_logo
By

पारगाव ता. १४ : पारगाव (ता.आंबेगाव) ते लाखणगाव रस्त्यावर बापू किसन धरम (वय ५० रा. लाखणगाव) यांना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी पोलिस असल्याची बतावणी करून गळ्यातील सव्वादोन तोळे वजनाची सोन्याची चैन हातचलाखी करून लंपास केली.
पारगाव कारखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापू धरम हे मंगळवारी (ता. १३) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पारगाव गावचे हद्दीत लाखणगाव रस्त्यावर चीजगाई वस्ती दरम्यान मोटारसायकल वरून जात होते. तेव्हा त्यांच्या पाठीमागून मोटरसायकलवरून दोन अनोळखी इसमांनी येत धरम यांची मोटरसायकल अडवली. त्यानंतर पोलिस असल्याचे सांगून नागापूर येथे चोरी झाली आहे. तेव्हा तुमच्या गळ्यातील सोन्याची चैन आम्हाला चेक करायची आहे, असे सांगून चैन घेऊन हात चलाखी करत सुमारे ९० हजार रुपये किमतीची सव्वा दोन तोळे वजनाची सोन्याची चैन लंपास केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक लहुजी थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव पोलिस करत आहे.