अवसरीत आढळला बिबट्याचा मृत बछडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवसरीत आढळला
बिबट्याचा मृत बछडा
अवसरीत आढळला बिबट्याचा मृत बछडा

अवसरीत आढळला बिबट्याचा मृत बछडा

sakal_logo
By

पारगाव, ता. १५ : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील वरचा हिंगे मळा (घाटी वस्ती) येथील श्‍यामकांत नरहरी हिंगे यांच्या शेतात बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला. त्यामुळे परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीने धास्तावला आहे.
वरचा हिंगे मळा येथील डिंभे उजव्या कालव्यालगत हिंगे यांचे मक्याचे पीक आहे. मका सुमारे सहा फूट उंच वाढलेली आहे. हिंगे हे गुरुवारी (ता. १५) सकाळी आठ वाजता शेतातील मक्याच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांना आत कसला तरी वास आला. त्यामुळे त्यांनी सरीत पाहिले असता बिबट्याचा बछडा मृतावस्थेत पडलेला दिसला. सहा महिने वयाचा नर जातीचा हा बिबट्या आहे. एक-दोन दिवसात बछडा मृत झाला असावा, अंदाज व्यक्त केला आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौधळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदिप कासारे, वनरक्षक सूर्यकांत कदम, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. येवले, पोलिस पाटील माधुरी जाधव यांनी मृत बिबट्याची आणि परिसराची पाहणी केली. या बिबट्याचे शवविच्छेदन करून पंचांच्या समक्ष अंत्यसंस्कार करण्यात आले.