Sat, Feb 4, 2023

धामणीतील मातीनालमधील गाळ
काढण्याच्या कामाचा प्रारंभ
धामणीतील मातीनालमधील गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ
Published on : 24 December 2022, 9:12 am
पारगाव, ता. २४ : धामणी (ता. आंबेगाव) येथे आय. टी. सी. मिशन सुनहरा कल व ग्रामपंचायत धामणी यांच्यावतीने मातीनाला बांध खोलीकरणाच्या व गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ सरपंच रेश्मा अजित बोऱ्हाडे यांच्या हस्ते नारळ वाढवून केला.
या कामासाठी आय. टी. सी. मिशन सुनहरा कल अंतर्गत घोडनदी खोरे प्रकल्प, डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर (नारायणगाव) यांच्यावतीने धामणी परिसरामध्ये मृद व जलसंधारण अंतर्गत सुमारे तीन लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहे.
यावेळी माजी सरपंच सागर जाधव, ग्रामपंचायत सदस्य अक्षय विधाटे, सहकारी सोसायटी संचालक सुधाकर जाधव, आय. टी. सी. मिशन सुनहरा कल चे अधिकारी सूरज गुप्ता, कृषी विस्तार अधिकारी किरण सोंडकर, अभियंता रमेश बारगजे आदी उपस्थित होते.