Fri, Feb 3, 2023

धामणी येथे जळालेले रोहित्र बदलल्याने समाधान
धामणी येथे जळालेले रोहित्र बदलल्याने समाधान
Published on : 26 December 2022, 11:00 am
पारगाव, ता. २६ : धामणी (ता. आंबेगाव) येथील गवंडीमळ्यातील रोहित्र (ट्रान्सफार्मर) जळाल्याने विहिरीवरील मोटारी बंद पडल्याने शेतातील पिकांना पाणी देता येत नव्हते. रब्बी हंगामातील पिके सुकू लागली होती. ते महावितरणने तातडीने बदलल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य गणेश भुमकर व प्रतीक जाधव पाटील यांच्या पाठपुराव्याने महावितरणने तातडीने बंद पडलेला ट्रान्सफॉर्मर बदलले.
जाधव पाटील आणि भुमकर यांनी रोहित्र जळाल्याची बाब जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील तसेच भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला व तातडीने नवीन रोहित्र बसविले.
01831