आंबेगाव तालुकाही ठरतोय व्यावसायिक शिक्षणाची पंढरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगाव तालुकाही ठरतोय 
व्यावसायिक शिक्षणाची 
पंढरी
आंबेगाव तालुकाही ठरतोय व्यावसायिक शिक्षणाची पंढरी

आंबेगाव तालुकाही ठरतोय व्यावसायिक शिक्षणाची पंढरी

sakal_logo
By

आंबेगाव तालुकाही ठरतोय
व्यावसायिक शिक्षणाची
पंढरी


आंबेगाव तालुका तालुका शैक्षणिक क्षेत्रातही अग्रेसर बनला आहे. अवसरी खुर्द येथे उभ्या राहिलेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतनमुळे पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील सर्वसामान्यांच्या कुटुंबातील मुलांना व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. येथून दरवर्षी शेकडो विद्यार्थी अभियांत्रिकीची पदवी घेऊन बाहेर पडत आहेत. आंबेगाव तालुक्याची व्यावसायिक शिक्षणाची पंढरी म्हणून नव्याने ओळख निर्माण झाली आहे.

सुदाम बिडकर, पारगाव

आंबेगाव तालुका विकास कामे, कृषी क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही अग्रेसर बनला आहे. अवसरी खुर्द येथे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून उभ्या राहिलेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतनमुळे पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील सर्वसामान्यांच्या कुटुंबातील मुलांना व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. येथून दरवर्षी शेकडो विद्यार्थी अभियांत्रिकीची पदवी घेऊन बाहेर पडत आहेत. आंबेगाव तालुक्याची व्यावसायिक शिक्षणाची पंढरी म्हणून नव्याने ओळख निर्माण झाली आहे.

आंबेगाव तालुक्याच्या शेजारील खेड, चाकण, रांजणगाव, भोसरी परिसरात औद्योगिक विकास झपाट्याने झाला आहे. त्या ठिकाणी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी उद्योग सुरु केले आहेत. त्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या तालुक्यातील हजारो युवकांना त्या कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन उभे राहिले. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील सर्वसामान्यांच्या कुटुंबातील मुलांना व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भीमाशंकर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पारगाव येथे डी. जी. वळसे पाटील इंग्रजी माध्यमाची शाळा आणि दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय सुरु झाले आहे. त्यामुळे पूर्व भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. याठिकाणी दोन वेगवेगळी सुसज्ज प्रशस्त शैक्षणिक संकुल उभे राहिले आहे.
दिलीप वळसे पाटील संस्थापक असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्या माध्यमातून मंचर येथे नालंदा इंग्रजी माध्यमाची शाळा, डिंभे, आंबेगाव वसाहत (घोडेगाव), खडकी, जारकरवाडी व लाखणगाव येथे माध्यमिक विद्यालये सुरु झाली आहे. भोसरी येथेही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु झाली आहे.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील संस्थापक असलेल्या श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ (लांडेवाडी) संचलित शिक्षण संस्थेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी, शिवाजीराव द. आढळराव पाटील विद्यालय, आढळराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, भीमाशंकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, डेक्कन मराठा ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, ब्लुबेल प्रेप स्कूल आदी विद्यालय व महाविद्यालय आहेत. या संस्थेमध्ये तीन हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
गोनवडी (घोडेगाव) येथे शासकीय आयटीआयसाठी सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. तालुक्यातील एकूण २३५ प्राथमिक शाळा, ५५ माध्यमिक विद्यालय व तीन महाविद्यालयांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तालुक्यातील अनेक गावात इंग्रजी माध्यमाची ज्युनिअर व सिनिअर केजी सुरु झाल्या आहे.
नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्थेच्या तालुक्यात पोंदेवादी, खडकवाडी, गिरवली येथे माध्यमिक विद्यालय आहे. रयत शिक्षण संस्थेच्या मंचर येथे महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (वडगाव काशिंबेग व चांडोली बुद्रुक भागशाळा), अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, अवसरी खुर्द येथे श्री भैरवनाथ विद्यालयात माध्यमिक शिक्षणाबरोबर किमान कौशल्य अभ्यासक्रम, धामणी येथील श्री शिवाजी विद्यालय तालुक्याच्या पूर्व
भागातील सर्वात जुने विद्यालय या विद्यालयात शिक्षण घेतलेले शेकडो विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहे. पिंपळगाव खडकी, नारोडी, मंचर, महाळुंगे पडवळ, रांजणी (वळती व मांजरवाडी भागशाळा), शिनोली, कुरवंडी, जांभोरी, असाणे, माळीण येथील विद्यालयांच्या माध्यमातून सुमारे १० हजाराहून जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे पारगावतर्फे खेड येथे माध्यमिक विद्यालय आहे.

खेड्यातील मुलांना क्रीडाविषयक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून मंचर या मध्यवर्ती ठिकाणी अद्ययावत क्रीडासंकुल उभारले आहे. तेथे जलतरण तलावासह अनेक प्रकारच्या क्रीडाविषयक सुविधा उपलब्ध आहेत. लोणी येथे माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीच्या पुढाकाराने कोट्यवधी रुपये खर्चाची शाळेसाठी सुसज्ज व प्रशस्त इमारत उभी राहत आहे. अवसरी बुद्रुक येथील विद्या विकास मंदिर विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेमुळे सुमारे ५० किलोमीटरच्या परिघातून दररोज १५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहे. गावडेवाडी येथील हिरकणी विद्यालयात तंत्र शिक्षण, थ्रीडी पेंटिंग, कृषी विषयक अभ्यासक्रम शिकवले जातात. निरगुडसर येथील निरगुडेश्वर शिक्षण मंडळ या संस्थेचे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व द. गो. वळसे पा. उच्च माध्य. (कला) विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रदिप वळसे पाटील व उपाध्यक्ष रामदास वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. तालुक्यातील अनेक गावात स्थानिक शिक्षण संस्थांच्या माध्यमातूनही अनेक माध्यमिक विद्यालय चांगल्या प्रकारे ज्ञानदानाचे काम करत आहे.

आश्रमशाळा, वसतिगृहाची सोय
आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम दुर्गम व डोंगराळ भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आहुपे, राजापूर, गोहे, तेरुंगण व असाणे येथील आश्रमशाळांच्या सुसज्ज इमारती उभ्या राहिल्या आहे. शासनाच्या वतीने मंचर येथे आदिवासी मुलींसाठी शासकीय वसतिगृह; तर पेठ येथे अनुसूचित जाती व जमाती मुलांसाठी निवासी शाळा, घोडेगाव येथे आदिवासी मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु आहे. या तिन्ही ठिकाणी सुसज्ज प्रशस्त इमारती उभ्या राहिल्या आहे. सकाळ माध्यम समूहाच्या रिलिफ फंडातून एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च करून आदिवासी विद्यार्थांसाठी वसतिगृहाची उभारणी केली आहे.