अंकुश शिंगाडे यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंकुश शिंगाडे यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार
अंकुश शिंगाडे यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार

अंकुश शिंगाडे यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार

sakal_logo
By

पारगाव, ता. १० : अवसरी बुद्रूक (ता. आंबेगाव) येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अंकुश मारुती शिंगाडे यांना स्टार एज्युकेशन एक्स्पो (मुंबई) या संस्थेच्यावतीने उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने सन्मानित केले आहे. संस्थेच्या संचालिक श्रीमती मोनिका आणि संतोष बलसार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला. मुंबई येथील नेहरू सेंटर वरळी येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात संपूर्ण देशभरातून १०१ प्राचार्यांना या पुरस्काराने गौरविले आहे. गुणवत्ता या निकषाच्या आधारे या संस्थेने पुरस्कारार्थींची निवड केलेली आहे. विद्या विकास मंदिर विद्यालयात राबविले जाणारे विविध उपक्रम, दहावी, बारावीचे सातत्यपूर्ण १००% निकाल, शिष्यवृत्ती निकाल, विविध स्पर्धा परीक्षांतील यश, क्रिडा-कला क्षेत्रातील यश, शालेय शिस्त, अभ्यासिका हा विशेष उपक्रम, इत्यादी विविध उपक्रमांच्या आधारे मूल्यांकन करून गुणवत्तेच्या निकषांवर अंकुश शिंगाडे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.