पारगाव येथे कलशारोहण सोहळा थाटात

पारगाव येथे कलशारोहण सोहळा थाटात

पारगाव, ता. ६ : पारगाव (ता. आंबेगाव) येथील माळीमळा येथे श्री मळगंगा माता मंदिर कलशारोहण सोहळा व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

संतकृपा ज्ञानदान व अन्नदान संस्थेतील (आळंदी) विद्यार्थी, ज्ञानेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे टाळ-मृदंग, तसेच श्री संत सावता महाराज ढोल ताशा पथक (पारगाव) यांच्या गजरामध्ये श्री मळगंगा मातेच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली.

शिवयोगी बाबा यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा पार पडला. याप्रसंगी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, संचालक बाळासाहेब घुले, रामचंद्र ढोबळे, माऊली आस्वारे, सरपंच बबनराव ढोबळे यांनी भेट दिली. हभप जालिंदर महाराज करंडे यांचे हरिकीर्तन झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे नियोजन शरद बँकेचे संचालक दौलत लोखंडे, प्रकाश लोखंडे, उद्योजक दिलीप लोखंडे, अभिमन्यू लोखंडे, संभाजी लोखंडे , शिवाजी लोखंडे, मनोज कांताराम लोखंडे, दिलीप शंकर लोखंडे, सागर लोखंडे ,विठ्ठल लोखंडे, निखिल लोखंडे, सचिन लोखंडे व मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी केले.
-----------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com