सुक्रे कुटुंबाच्या मदतीसाठी
प्रयत्न करण्याची मागणी

सुक्रे कुटुंबाच्या मदतीसाठी प्रयत्न करण्याची मागणी

पारगाव, ता. ७ : खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्या विजया दिलीप डोके (वय ४५) व त्यांचा मुलगा संकेत दिलीप डोके (वय २०) या माय लेकांसह संकेत याचा जिवलग मित्र ओंकार चंद्रकांत सुक्रे (वय २०) या तिघांचा चार दिवसांपूर्वी धामारी (ता. शिरूर) येथे बेल्हे-जेजुरी महामार्गावर टेम्पोची दुचाकीला जोरात धडक बसून झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या दोघांनीही खडकवाडी येथे जाऊन डोके व सुक्रे परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले.
सुक्रे कुटुंबाची परिस्थिती एकदम हलाखीची आहे. ओंकार सुक्रे हा एकुलता एक होता, तोच कुटुंबाचा एकमेव आधार होता. त्यामुळे त्या कुटुंबाला आर्थिक आधार देणे ही, ओंकार याला खरी श्रद्धांजली ठरेल. त्याकरिता सुक्रे कुटुंबाला मदत मिळण्याकरिता आपण प्रयत्न करावे, अशी मागणी माजी सरपंच अनिल डोके यांनी वळसे पाटील व आढळराव पाटील यांच्याकडे केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com