
गडदादेवी यात्रेत धावले १९१ बैलगाडे
पारगाव, ता. ८ : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील श्री. गडदादेवी यात्रा उत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत एकूण १९१ बैलगाडे पळाले. प्रथम क्रमांकात फळीफोडचा मान उत्तम भीमाजी गव्हाणे (लांडेवाडी) यांच्या गाड्याने मिळवला. तर घाटाचा राजा किताब किशोर बारकू वरे (पिंपरखेड) यांच्या गाड्याने पटकाविला. विजेत्या बैलगाड्यांना एकूण एक लाख रुपये तसेच एक जुंपता गाडा, एक टीव्ही, चार फॅन, सहा स्मार्ट वॉच, तीन सायकल, एक ट्रॉफी बक्षीस देण्यात आले.
मंगळवारपासून (ता. ७) यात्रेला उत्साहात सुरुवात झाली. सकाळी ७ ते १० देवीस हारतुरे व महापूजा करण्यात आली. सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बैलगाड्याच्या शर्यती झाल्या. घाटाचे उद्घाटन पारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे यांच्या हस्ते झाले. एकूण १९१ बैलगाडे पळाले. प्रथम क्रमांकात फळीफोडचा मान उत्तम भीमाजी गव्हाणे (लांडेवाडी) यांनी मिळवला. या क्रमांकात एकूण २० गाडे बसले. व्दितीय क्रमांकात फळीफोडचा मान आरुष नितीन पाचारणे (लाखणगाव), तृतीय क्रमांकात फळीफोडचा मान कानिफनाथ मुरलीधर लबडे(जारकरवाडी), चतुर्थ क्रमांकात फळीफोडचा मान बजरंग भिकाजी वाळुंज (लोणी) यांनी पटकाविला, घाटाचा राजा किताब किशोर बारकू वरे (पिंपरखेड) यांच्या गाड्याने पटकाविला. यात्रेचे नियोजन खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी सरपंच जयसिंग पोंदे, उपसरपंच महेंद्र पोखरकर, सुशांत रोडे, उद्योजक संदीप पोखरकर, अशोक वाळुंज, पोपट रोडे, आनंदा पोंदे, रामदास वाळुंज, नानाभाऊ पोखरकर, शिवराम पोखरकर, नीलेश दौंड, अमोल वाळुंज, संदेश डुकरे, संतोष पोखरकर व यात्रा उत्सव समितीने केले.