
पारगाव येथे शिवभक्तांना मसाला दुधाचे वाटप
पारगाव, ता. २० : येथे (ता. आंबेगाव) येथे शिवनेरी किल्ल्यावर शिवज्योत आणण्यासाठी जाणाऱ्या शिवभक्तांसाठी मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. सुमारे दोनशे लिटर दुधाचे यावेळी वाटप करण्यात आले.
शिवनेरी किल्ल्यावर शिवज्योत आणण्यासाठी जाणाऱ्या शिवभक्तांसाठी पारगाव येथील चक्रधर नवतरुण मित्रमंडळ (निमणबेट), तुकाईदेवी मित्र मंडळ (ढोबळे मळा) यांच्या वतीने मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे हे चौथे वर्ष आहे. यावेळी सरपंच बबनराव ढोबळे, माजी उपसरपंच विठ्ठल सीताराम ढोबळे उपस्थित होते. प्रकाश ढोबळे, अँड.अशोक ढोबळे, संदीप ढोबळे, अमोल ढोबळे, योगेश बढेकर, प्रसाद शेवाळे, सुनील पानमंद, दयानंद ढोबळे, राहुल ढोबळे, नवनाथ ढोबळे, तेजेश ढोबळे, अक्षय ढोबळे, अशोक ढोबळे, ऋषिकेश ढोबळे, कल्याण ढोबळे, संजय ढोबळे, कानिफनाथ ढोबळे, शिवहारी ढोबळे, विरेंद्र ढोबळे, सुनील पवार, स्वप्नील ढोबळे, अनिकेत ढोबळे, प्रसाद ढोबळे, पंढरी बढेकर, अविनाश मांजरे, सार्थक ढोबळे यांनी या उपक्रमाची व्यवस्था पहिली.
02093