मराठीचे संवर्धन होणे गरजेचे : डॉ. गायकवाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठीचे संवर्धन होणे गरजेचे : डॉ. गायकवाड
मराठीचे संवर्धन होणे गरजेचे : डॉ. गायकवाड

मराठीचे संवर्धन होणे गरजेचे : डॉ. गायकवाड

sakal_logo
By

पारगाव, ता. १ : ‘‘दिवसेंदिवस मराठी भाषा बोलण्याचे प्रमाण कमी झाले असून, भाषेचे संवर्धन होणे गरजेचे आहे. सर्व संतांनी मराठी भाषेविषयी गौरवोद्गार व्यक्त केले असून इंग्रजी भाषेचा होणारा हस्तक्षेप जरी मराठी भाषेस घातक असला तरी इंग्रजी भाषेचा द्वेष न करता आपण दैनंदिन जीवनात मराठी शब्दांचा वापर करून मराठी जतन केली पाहिजे.’’ असे मत डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी व्यक्त केले.
पारगाव (ता. आंबेगाव) येथील दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी गायकवाड बोलत होते. या कार्यक्रमाची सुरूवात शिक्षण संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी बी. डी. चव्हाण, संस्थेचे कार्यालयीन सचिव वसंत जाधव, प्राचार्य डॉ. शत्रुघ्न थोरात, प्रा. फदाले यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली.
बी. डी. चव्हाण म्हणाले, ‘‘अनेक भाषांचा अभ्यास करा, मोठे व्हा, आभाळाला कवेत घेण्याची क्षमता जरी आपल्यात आली तरी, आपल्या मराठी भाषेला विसरू नका.’’
कार्यक्रमाचे आयोजन प्रा. सुप्रिया तिवाटणे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. प्रियंका वायाळ यांनी तर आभार प्रा. दीपाली बोंबले यांनी मानले.