वडगावपीर येथील २५ एकरातील झाडेझुडपे वणव्यामुळे खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगावपीर येथील २५ एकरातील झाडेझुडपे वणव्यामुळे खाक
वडगावपीर येथील २५ एकरातील झाडेझुडपे वणव्यामुळे खाक

वडगावपीर येथील २५ एकरातील झाडेझुडपे वणव्यामुळे खाक

sakal_logo
By

पारगाव, ता. १ : वडगावपीर (ता. आंबेगाव) येथील पोखरकरमळा नंबर तीन लगत असलेलेल्या डोंगराला बुधवारी (ता.१) दुपारी लागलेल्या वणवा लागला. यामध्ये वनविभाग तसेच खासगी मालकी हक्काची मिळून एकूण २५ एकर क्षेत्रातील झाडेझुडपे जळून खाक झाली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या तीन तासांच्या अथक प्रयत्नामुळे आग आटोक्यात आणली व मोठ्या प्रमाणावरील क्षेत्र आगीपासून वाचविण्यात यश आले.
पोखरकरमळा नंबर तीन असलेलेल्या डोंगराला अज्ञात व्यक्तीने आग लावली यामुळे वणवा भडकला. याची माहिती कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस, वनपाल सोनल भालेराव, वनरक्षक पूजा पवार यांच्या सूचनेवरून वनविभागाचे कर्मचारी बाळासाहेब आदक, बाळासाहेब लंके, रेस्क्यू पथकाचे सदस्य गोरक्ष सिनलकर, सोन्या लंके, कल्पेश बढेकर, गोविंद वाघ, पप्पू पोखरकर, जोजारी हे तातडीने घटनास्थळी केले व आग आटोक्यात आणण्यासाठी पंप, पोती व झाडांच्या पाल्याने वापर करत तीन तासांच आग विझवली.

02145