
मैत्री ग्रुपने पटकविला छत्रपती शिवाजी महाराज चषक
पारगाव, ता. १२ : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील भूतनाथ तरुण मित्र मंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक पर्व चौथे या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १२ संघांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांक मंचरच्या मैत्री ग्रुपने पटकावला. रोख ८० हजार रुपये, ट्रॉफी, एक सायकल असे बक्षिस देण्यात आले.
द्वितीय क्रमांक मोरया युवा प्रतिष्ठान (पारगाव शिंगवे), तृतीय क्रमांक साईलीला चॅरिटेबल ट्रस्ट (अवसरी बुद्रुक) तर चतुर्थ क्रमांक विष्णूकाका स्पोर्ट स्वर्गीय कांताराम बापू हिंगे पाटील प्रतिष्ठान (अवसरी बुद्रुक) यांनी पटकविला. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बक्षीस असलेली सायकल समीर पवार यांनी पटकाविली. जनहित प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तसेच शिक्षण प्रसारक मंडळीच्या संचालिका सुवर्णा योगेश चव्हाण यांच्याकडून सहभागी प्रत्येक संघाना क्रिकेट साहित्य किट देण्यात आले.
बक्षीस वितरण जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष विष्णू काका हिंगे, उद्योजक योगेश चव्हाण, बाळासाहेब हिंगे, श्रीहरी हिंगे, संतोष हिंगे, दीपक चवरे, आशुतोष हिंगे, दीपक हिंगे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे नियोजन श्रीहरी हिंगे पाटील, मंगेश हिंगे पाटील, प्रवीण हिंगे पाटील, चेतन हिंगे पाटील आणि भूतनाथ तरुण मित्र मंडळ (भोकरशेत) च्या सभासदांनी केले.
अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) : येथील भूतनाथ तरुण मित्र मंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला मंचरचा मैत्री ग्रुप.