धामणी जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामणी जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
धामणी जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

धामणी जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

sakal_logo
By

पारगाव, ता. १४ : धामणी (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे व ग्रामस्थांनी शाळेला तब्बल दीड लाख रुपयांची देणगी दिली.

येथील प्राथमिक शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असते.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन ईश्वरी गाडेकर व स्वरा रोकडे या दोन चिमुकल्या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी भालचंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.


या प्रसंगी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, पारगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक लहु थाटे, अॅड. विठ्ठलराव जाधव पाटील, न्यायाधीश गोरक्ष लंघे, सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, उपसरपंच संतोष करंजखेले, उद्योजक ज्ञानेश्वर विधाटे, विजय जाधव, शांताराम जाधव, विलास पगारिया, डॉ. संतोष ढुमणे, माजी सरपंच सागर जाधव, नितीन जाधव, महेश कदम, महेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य अक्षय विधाटे, आनंदा जाधव, माधव बोऱ्हाडे उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात गावठाण अंगणवाडीच्या मुलांच्या गाण्याने झाली. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकूण १५ गाणी, नाटके सादर केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य पाहून पालक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रत्येक नृत्यासाठी मोठ्या प्रमाणावर बक्षीसांची खैरात केली. शाळेमध्ये टीव्हीएस कंपनीच्याच्या सीएसआर फंडातून विविध विकास कामांसाठी तब्बल १५ लाख रुपयांची कामे केल्याबद्दल कंपनीचे अधिकारी योगेश्वर पाटील, सोमनाथ काटकर, अविनाश लाकुडझोडे, नवनाथ राक्षे, संगीता वाळूंज यांचा त्याचप्रमाणे वर्षभर विद्यार्थ्यांसाठी मोफत संस्कार शिबिर घेतलेल्या सुनीता विधाटे यांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा कथले- ढुमणे यांना ग्रामस्थांच्या वतीने आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

शाहीर दिनेश जाधव व शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या समृद्धी गवंडी, स्वरांजली जाधव, आदिराज जाधव, खुशी कदम, हर्षद जाधव, सई बोऱ्हाडे, विशाखा बांगर, वैष्णवी बांगर, ओम रणपिसे व आदर्श विद्यार्थी म्हणून श्रेयश चौरे, आदर्श विद्यार्थिनी ईश्वरी गाडेकर यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश भुमकर यांनी केले
---------------
धामणी (ता. आंबेगाव) : जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा कथले- ढुमणे यांचा विशेष गौरव करताना
ग्रामस्थ.