अजून किती अपघातानंतर कामाचा मूर्हूर्त?

अजून किती अपघातानंतर कामाचा मूर्हूर्त?

पारगाव, ता. १३ : पारगाव (ता. आंबेगाव) परिसरातून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गालगत असलेल्या गटाराचे काम गेली अनेक महिन्यांपासून अर्धवट आहे. उघड्या गटारामुळे वारंवार अपघात घडत आहेत. दीड महिन्यापूर्वी उघड्या गटारात कोसळल्याने मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला होता. त्या गटाराची अद्याप दुरुस्ती केली नाही. त्यामुळे अजून किती अपघात घडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित ठेकेदाराला अपूर्ण काम पूर्ण करण्यास मुहूर्त सापडेल, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
अष्टविनायक महामार्ग अंतर्गत रांजणगाव ते ओझर हा रस्ता पारगाव परिसरातून जात आहे. या रस्त्याचे काम गेली वर्षभरापासून संथगतीने सुरु आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या गटार लाईन काम अर्धवट असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याबाबत ‘सकाळ’मध्ये वारंवार वृत्त प्रसिद्ध झाली आहे. काम पूर्ण करण्याबाबत नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही संबंधित ठेकेदार अपूर्ण काम पूर्ण करत नाही. त्यातच दीड महिन्यापूर्वी मोटारसायकलस्वार उघड्या गटारीच्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने मोटारसायकलसह गटारीच्या खड्ड्यात कोसळला. गटारीला असलेल्या उघड्या लोखंडी गजामुळे त्यांना गंभीर जखमा झाल्या होत्या.
त्यामुळे आणखी गंभीर दुर्घटना घडू नये म्हणून गटारांचे अर्धवट काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी पारगावचे ग्रामपंचायत सदस्य किरण शांताराम ढोबळे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com