
टाव्हरेवाडी येथे महिलांसाठी कॅन्सर निदान शिबिर
पारगाव, ता. १७ : टाव्हरेवाडी (ता. आंबेगाव) येथे जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत टाव्हरेवाडी, गेटवेल हॉस्पिटल (मंचर) व डॉ. साळी मेडिकल फौंडेशन यांच्यावतीने तसेच गावातील महिला बचत गटाच्या सहकाऱ्याने महिलांसाठी मोफत स्री रोग व कॅन्सर निदान शिबिर आयोजित केले होते.
महिलांसाठी मोफत स्त्रीरोग व कॅन्सर निदान शिबिरात एकूण ४७ महिलांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधे व उपचार केले. शिबिराचे उद्घाटन डॉ.सोनाली शिंदे यांच्या हस्ते केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब टाव्हरे, सरपंच उत्तम टाव्हरे, उपसरपंच भरत टाव्हरे, सेवानिवृत्त सेल टॅक्स अधिकारी सुभाष टाव्हरे, ग्रामपंचायत सदस्य सानिका टाव्हरे, मोहिनी बांगर, ज्योती पवार, रोहिणी राक्षे, मनीषा बांगर, सुवर्णा टाव्हरे, राजेंद्र हिंगे, शिक्षक महेश शिंदे, कमल भुरकुंडे, मुख्याध्यापक साधना गाडगे आदी उपस्थित होते.
गेटवेल हॉस्पिटलचे डॉ.मोहन साळी यांनी महिलांना स्त्रियांचे आजार व त्यासंबंधी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. या आरोग्य शिबिरामध्ये ४७ महिलांची आरोग्य तपासणी व मोफत औषधे व उपचार केले. पुढील तपासण्या व उपचार गरज पडल्यास शस्त्रक्रिया सवलतीच्या दरामध्ये करण्यात येतील असे डॉ. मोहन साळी यांनी सांगितले. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा असे आव्हान डॉ. साळी यांनी केले व ग्रामसेवक हनुमंत बारवे यांनी आभार मानले.