धामणीत भैरवनाथ जोगेश्वरी उत्सवानिमित्त कार्यक्रम

धामणीत भैरवनाथ जोगेश्वरी उत्सवानिमित्त कार्यक्रम

पारगाव, ता. २२ : धामणी (ता. आंबेगाव) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ-जोगेश्वरी उत्सवानिमित्त फाल्गुन कृष्ण त्रयोदशीला सोमवारी (ता. २०) धार्मिक कार्यक्रमाचे व पालखीचे आयोजन केले होते.
सकाळी श्रींची महापूजा देवस्थानचे परंपरागत सेवेकरी रोडे मंडळींच्या हस्ते करण्यात आली. रात्री काळभैरवनाथाच्या व जोगेश्वरीच्या पंचधातूच्या मुखवट्याची पालखीतून छबिना मिरवणूक हलगी, ढोलकी, सनई, संबळ, तुतारी व ताशाच्या निनादात वाजतगाजत भंडाऱ्याची उधळण करून काढण्यात आली. या वेळी भैरवनाथाचं चांगभलंच्या जयघोषात पालखीचे धामणीच्या बाजारपेठेत ग्रामस्थांनी उत्साहाने स्वागत करून दर्शन घेतले. देवाच्या पालखीच्या मिरवणुकीत रोडे जथेकरी सहभागी झाले होते. देवाची पालखी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात पोहोचल्यानंतर खंडोबाची व भैरवनाथाची जोगेश्वरीची आरती करण्यात आली. या वेळी ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराचे शिखराच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून शिखराच्या रंगभरणीचे काम लवकरच धामणी ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून सुरु करण्यात येऊन मंदिराच्या शिखराचे कलशारोहण करण्याचा व त्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. भैरवनाथ मंदिराची दगडी संरक्षक भिंत पूर्णपणे ढासळलेली आहे. त्या भिंतीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येणार असल्याने त्याची पूर्तता करण्यासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे रोडे मंडळींनी सांगितले या वेळी लक्ष्मण रोडे, आबाजी रोडे, बाळकृष्ण रोडे, बबनराव रोडे, कैलासराव रोडे, बबन गेनभाऊ जाधव, हनुमंत जाधव, एकनाथ भिका जाधव, शांताराम रोडे, गोपाळ रोडे, हनुमंत रोडे, संदीप रोडे, अनिकेत रोडे, बाळू रोडे, सचिन रोडे, निकेश रोडे, दत्ता रोडे, सूर्यकांत रोडे, नीलेश रोडे, सीताराम जाधव वाघे, माऊली जाधव वाघे, दिनेश जाधव, नामदेव पवार, पमाजी पंचरास उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com