लाखणगावात मोटारीची
विजेच्या खांबाला धडक

लाखणगावात मोटारीची विजेच्या खांबाला धडक

पारगाव, ता. २४ : बेल्हे-जेजुरी महामार्गावर लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील रोडेवाडी फाट्याजवळ वॅगनर मोटार रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या सिमेंट खांबाला जोरात धडकली. यात विजेचा खांब मोडून पडला. या अपघातात मोटारीमधील दोघे किरकोळ जखमी झाले. मात्र, मोटारीचे मोठे नुकसान झाले. माळशेज येथून गुरुवार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुणे येथे जाणाऱ्या वॅगनर मोटारीचे (क्रमांक एमएच १२ एसएल ८५७६) अचानक हँडल लॉक झाले. त्यामुळे मोटार रस्त्याच्या बाजूला असलेल्या महावितरणच्या सिमेंट खांबाला जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की सिमेंट खांब मोडून पडला. यात मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोटारीत चालक व त्याच्या बरोबर असलेली एक व्यक्ती प्रवास करत होते. ते दोघेही सुखरूप असून, किरकोळ जखमेवर निभावले.
या घटनेची माहिती कळतच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. महावितरणचे ठेकेदार राजेंद्र वाळुंज यांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळी जाऊन नवीन खांब उभा करून वीज पुरवठा सुरळीत केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com