दूध विक्रीवरून मारहाण; सहा जणांविरद्ध गुन्हा

दूध विक्रीवरून मारहाण; सहा जणांविरद्ध गुन्हा

पारगाव, ता.२७ : जारकरवाडी (वैदवाडी फाटा, ता. आंबेगाव) येथे बेकायदा गर्दी जमवून दूध विक्रीच्या वादातून दूध व्यवसाय करणाऱ्या दोघांना गंभीर मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी परगाव पोलिस ठाण्यात सहा जाणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सामतभाई ऊर्फ श्याम कबुभाई अलगोतर यांनी पारगाव पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली. अलगोतर हे शनिवारी (ता. २४) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वैदवाडी फाटा येथे असताना तेथे गाडीतून रूपेश सोंडला, लक्ष्मण सोंडला, नागजी सोंडला, काळु रूपेश सोंडला, शैलेष नागजी सोंडला, विक्रम रूपेश सोंडला हे आले. त्यांनी फिर्यादी व त्याचे बरोबर असलेले देवकनभाई सिधाभाई सभाड यांना ''आम्ही ज्या ठिकाणी दूध घालतो त्या ठिकाणी तुम्ही दूध घालायचे नाही'' अशी धमकी दिली. त्यावेळीं फिर्यादी आणि देवकनभाई तेथून क्रेटा गाडीने पळून जात असताना रूपेश, लक्ष्मण, नागजी यांनी गाडीचा पाठलाग करून त्यांची गाडी थांबवली. फिर्यादी आणि देवकन भाई गाडीमधून उतरून पारगाव येथील कारखान्याशेजारी असलेल्या नातेवाईकाच्या घराचा आश्रय घेण्यासाठी पायी पळत जात असताना त्यावेळी वरील तिघांनी त्यांना मध्येच जिवे मारण्याच्या हेतूने त्याच्या हातातील कुऱ्हाड देवकनभाई याच्या डोक्यात माथ्यावर मारून गंभीर दुखापत केली. तसेच लक्ष्मण याने त्याच्या हातातील काठीने देवकनभाई याच्या पाठीवर, पोटावर, पायावर व फिर्यादीच्या पाठीमध्ये, छातीवर मारहाण करून दुखापत केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com