गवारी यांना कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गवारी यांना कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान
गवारी यांना कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान

गवारी यांना कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान

sakal_logo
By

पारगाव, ता. ३० : भागडी (ता. आंबेगाव) येथील बाळासाहेब सीताराम गवारी यांना पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शेती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल २०२० -२१ या वर्षाकरीताचा कृषीभूषण डॉ. अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे येथे झालेल्या कार्यक्रमातात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद ग्रामीण विकास प्रकल्प संचालक शालिनी कडू, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बाल विकास जामसिंग गिरासे, जिल्हा कृषी अधिकारी संजय पिंगट, तालुका कृषी अधिकारी मनोज कोल्हे, कृषी सहायक रामचंद्र गोल्हे उपस्थित होते.
बाळासाहेब गवारी यांनी शेतीमध्ये कांदाचाळ, शेततळे, ठिबक सिंचन, गोबरगॅस, मल्चिंग पेपर, रोपवाटिका आदी आधुनिक प्रयोग राबवून फळशेती व भाजीपाला पिकांचे यशस्वी उत्पादन घेतले आदी कामगिरीचा विचार करून कृषिभूषण डॉ. अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार देण्यात आला. वितरण प्रसंगी सरपंच गोपाळ गवारी, दिनकर आदक, धोंडिभाऊ भोर, रमेश वरे, शांताराम बोंबे, गोरक्ष दरेकर, प्रशांत ढोमे, अक्षय गवारी, श्याम गवारी उपस्थित होते.

02307