आनंदाचा शिध्यातील हरभरा डाळीला सोंडे

आनंदाचा शिध्यातील हरभरा डाळीला सोंडे

पारगाव, ता. ९ : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे राज्यशासनाच्या वतीने रेशनकार्डधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येतो. यात दिली जाणारी हरभऱ्याची डाळ (पॅकिंग पिशवी) निकृष्ट दर्जाची असून, त्यास सोंडे किडे लागले आहेत. डाळीला छिद्रे पडल्याने ती खाण्यायोग्य राहिली नाही, यामुळे महिलांकडून संताप व्यक्त केला आहे.

येथील ग्रामपंचायत सदस्या कोमल हिंगे यांनाच (पॅकिंग पिशवी) मिळालेली डाळ ही निकृष्ट दर्जाची असून, तिची किडे लागून अक्षरशः पावडर तयार झाली आहे. अशाच प्रकारे सागर टाव्हरे व इतर काही लोकांना ही निकृष्ट दर्जाची डाळ मिळाली आहे. तर आमच्या जनावरांना देखील इतके खराब धान्य खायला घालत नसल्याचे बबनराव धर्माजी हिंगे यांनी सांगितले. निकृष्ट डाळीचा पुरवठा करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर शासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेनेचे शाखाप्रमुख सूरज हिंगे यांनी केली आहे.

अवसरी बुद्रुक येथे खराब डाळ पुन्हा परत घेऊन दुसरी डाळ दिली आहे. इतरही कोणत्या गावात खराब डाळ मिळाल्यास ग्राहकांनी ती रास्तधान्य दुकानदार यांच्याकडे जमा करावी त्यांना डाळ बदलून दिली जाईल.
- रमा जोशी, तहसीलदार

पुरवठा विभागाकडून पॅकिंग डाळीचे पाकीट आलेले आहेत. त्याप्रमाणे आम्ही वाटप करत आहोत, ज्या नागरिकांचे खराब डाळ निघाली असेल त्यांचे ते बदलून देऊन आम्ही ती डाळ पुन्हा पुरवठा विभागाकडे पाठवून देऊ.
- अशोक दळवी, रास्तधान्य दुकानदार

02363, 02362

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com